Mangalwedha News : जि. प. साठी भाजप विरोधात लढणारा उमेदवार भाजपच्याच गळाला
esakal January 17, 2026 03:45 AM

मंगळवेढा - जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी हुलजंती गटात तीन वर्षापासून तयारी केलेले उद्योजक हनुमान दुधाळ यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी प्रवेश केला.

यावेळी उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, उद्योगपती कामानंद हेगडे, माजी उपसभापती शिवाजी पटाप, काशिनाथ पाटील, नंदू जाधव, नागेश मासाळ,बंडू शेणवे,विकास दुधाळ आदीसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

उद्योजक हनुमंत दुधाळ यांनी जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून हुलजंती जिल्हा परिषद गटात तयारी केली. त्यासाठी त्यांनी या गटातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, उपक्रमाला मदत केली.

याशिवाय धार्मिक उपक्रमात देखील सहभाग नोंद व त्यांनी सहकार्य करण्याची भूमिका मरवडेत सामाजिक काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली केली. त्यामुळे तेच त्यांचे राजकीय सल्लागार होते. अशा परिस्थितीत त्यांनी हे सामाजिक काम करताना कोणत्याही पक्षाबाबतची भुमिका स्पष्ट केली नव्हती.

त्यामुळे त्यांच्या विरोधात माजी सभापती प्रदीप खांडेकर हे लढतील अशी शक्यता होती त्यामुळे या गटातील लढत ही अतिशय लक्षवेधक होणार होते. अशा परिस्थितीत माझी सभापती प्रदीप खांडेकर यांनी भोसे गटातून निवडणूक लढवण्याचा इरादा स्पष्ट केल्यामुळे यांच्यासाठी हा गट तुर्त दुधाळ यांच्यासाठी मोकळा त्यामुळे त्यांना या मतदारसंघात काहीनी आघाडीकडून लढावे असा सल्ला दिला.

तर काहींनी सत्ताधाय्रानी भारतीय जनता पार्टी बरोबर लढण्यात सल्ला दिला या अवस्थेत गेली आठवड्याभर गोंधळात होते मात्र दोन दिवसापूर्वी काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीत त्यांचे नाव काँग्रेसकडून देण्यात आले होते मात्र त्या प्रत्यक्ष मुलाखतीला हजर नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आले.

आज काल भारतीय जनता पार्टी कडून आ. समाधान आवताडे यांच्या कार्यालयात जिल्हा परिषद इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यामुळे काल दिवसभर या मतदार संघातील राजकीय जानकार यांच्या राजकीय हालचालीवर होते त्यामुळे आज त्यांनी अधिकृत प्रवेश केला.

हुलजंती जिल्हा परिषद गटाचे आरक्षण ओबीसी पुरुष असो अथवा स्त्री हे अधिकृत दावेदार मानले जात होते. मात्र, या तीन महिन्यापूर्वी झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये या गटाचे आरक्षण हे इतर मागासवर्गीय महिलेसाठी आरक्षित करण्यात जाहीर झाले त्यासाठी त्यांच्या पत्नीची दावेदारी मानली जात होती.

कारण त्यांनी गेले दोन वर्षात मरवडे येथे पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक कामाला मुहूर्त रोवला. त्यामुळे आता त्यांच्या विरोधात उमेदवार शोधताना विरोधकांना नवीन पर्यायी चेहरा शोधावा लागणार आहे. दरम्यान लिंगायत मराठा व अन्य बहुजन समाज असलेल्या मतदारसंघातील लढत आता कशी होणार याकडे अधिक लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.