विद्यार्थी दशेतील शास्त्रज्ञांनी मांडले प्रगत भारताचे स्वप्न
esakal January 17, 2026 03:45 AM

KRK26B03727
करकंब (ता. पंढरपूर) : येथील अमोल विद्यालयात आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातील विजेत्यांसमवेत मान्यवर.
......
विद्यार्थी दशेतील शास्त्रज्ञांनी मांडले प्रगत भारताचे स्वप्न
.......
करकंबमधील विज्ञान प्रदर्शन नावीन्यपूर्ण प्रयोगांचे सादरीकरण

करकंब, ता. १६ : करकंब येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थी दशेतील शास्त्रज्ञांनी आपल्या कल्पकतेने भविष्यातील प्रगत भारताचे स्वप्न मांडले. यात सहभागी झालेल्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी अनेक समस्यांवर शास्त्रशुद्ध उपायही सुचविले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला खतपाणी मिळावे, या उदात्त हेतूने करकंब येथे विज्ञानाचा एक अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला. येथील अमोल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विज्ञान प्रदर्शन भरविले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रप्रमुख रविकिरण वेळापूरकर, प्राचार्य किसन सलगर, होळे गावचे सरपंच युवराज भुसनर, सचिन शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
पहिली ते दहावीच्या चार गटात विभागणी केलेल्या या प्रदर्शनातून प्रत्येक गटातील विजेत्यांना संस्थेच्या सचिव सुरेखा शेळके, तुळशी गावचे सरपंच शरद मोरे, कृषी तज्ञ मनोज शाह, अध्यक्ष अमोल शेळके यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तज्ञ परीक्षक म्हणून महेश माने (मोहोळ), नागनाथ भोसले (पांढरेवाडी), स्नेहल देशपांडे (पेहे) आणि समाधान खारे (पेहे) यांनी काम पाहिले. प्रदर्शन सोहळा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य किसन सलगर, प्राचार्य अजित पवार, समन्वयक बापू जाधव, दीपक उंबरदंड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

विज्ञान प्रदर्शनातील विजेते
गट अ (पहिली ते दुसरी) : प्रथम ईशा पवार (अन्न, आरोग्य, स्वच्छता), द्वितीय : आरोही माने, आदिती तळेकर, माधव माळी, सार्थक कवडे, राजवीर बोचरे (वाहतूक नियमन), तृतीय राही शीलवंत (अन्न, आरोग्य आणि स्वच्छता), उत्तेजनार्थ धैर्य शिंगटे (नैसर्गिक शेती). गट ब (दुसरी ते चौथी) प्रथम प्रणव शेळके, श्रद्धा टेके, ऐश्वर्या शेळके, आर्वी सूर्यवंशी (ग्लोबल वॉर्मिंग), द्वितीय शिवमल्हारी शिंदे (गणित मित्र साहित्य), तृतीय जयदीप लोंढे, समर्थ लोंढे, हर्षद गुंजाळ (हायड्रोलिक प्रेस), उत्तेजनार्थ महेश्वरी देशमुख (हवेचा दाब). गट क (पाचवी ते सातवी) प्रथम सिया शिंदे, वंश कुरणावळ, विराज देशमुख (वॉटर प्युरिफिकेशन), द्वितीय अंकिता गायकवाड, आश्लेषा सदावर्ते, स्वराली पुरवत, समृद्धी काटवटे (स्मार्ट डस्टबीन), तृतीय नीलराज शिवपालक, श्रीराम मदने, सोहम शिंदे, श्रेयस नरसाळे, शिवम शेळके (साखर कारखाना), उत्तेजनार्थ समर्थ शिंदे (रोबोट). गट ड (आठवी ते दहावी) प्रथम आदित्य कोरके, ऋतुजा कोरके (होलोग्राम), द्वितीय अथर्व मांजरे, ओमराज टकले, सुजय गुळमे (डिझास्टर मॅनेजमेंट), तृतीय यश बोंगाने (ओला, सुका कचरा व्यवस्थापन), उत्तेजनार्थ हर्षवर्धन शेळके, रुद्र गोरे, साहिल शिंदे, अनमोल कवडे, विजयराज वडतिले, आश्रय शिंदे, रणजित व्यवहारे (सोलर सिटी). गट इ (खुला) प्रथम पृथ्वीराज नागटिळक, लहू देवकुळे, आदिनाथ म्हेत्रे, ओंकार बनकर, आर्यन गायकवाड (सोलर ट्रॅकर आणि स्ट्रीट लाइट), द्वितीय ओंकार रेडे, प्रेमचंद्र शिंदे, ओम नगरे, माऊली फाळके (ऑटोमॅटिक फायर एक्टिंग्युशर), तृतीय संकेत कदम, विजय लोखंडे, रोहन निमगिरे, अकमल सुतार, प्राजक्ता रोडगे (ट्रॅफिक अलर्ट सिस्टम), उत्तेजनार्थ शुभम माळी, विनायक सरडे, युवराज देवकर माळी, विशाल गारडी (व्हेईकल ॲक्सिडेंट कंट्रोल प्रोजेक्ट).

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.