महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. भाजपला पहिल्यांदाच बीएमसीवर (मुंबई महापालिका) सत्ता स्थापनेची संधी मिळताना दिसत असून भाजपचाचा महापौर होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेा पुन्हा एकदा मोठा पराभव पत्करावा लागला आहे. बीएमसी निकालांचे कल हाती येताच सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला असून अनेकांना राज ठाकरेंची आठवण आली. अनेक जण रसमलाईची चर्चा देखील करत आहेत. नक्की काय आहे प्रकरण ?
सध्या सगळीकडे राज्यातील महापालिका निवडणुकांच्या निकालाची चर्चा होत्ये, पण सोशल मीडियावर राजकारण, भाजप नव्हे तर रसमलाई ट्रेंडमध्ये आहे. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या लोकांच्या पोस्टमध्ये प्रामुख्याने दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे : तामिळनाडूचे भाजप नेते अन्नामलाई आणि मनसे प्रमुख राज ठाकरे. अनेकांनी तर रसमलाईचा फोटो शेअर करत भाजपच्या बीएमसी निवडणुकीतील विजयाबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरेंचे अभिनंदन केलं आहे. एवढंच नव्हे तर ते त्यांना अन्नामलाई यांचीही आठवण करून देत आहेत. राज्यातील महापालिका निवडणुकीत राज ठाकरे यांचा मनसे पक्ष जोशाने उतरला, उद्धव ठाकरेंसोबत युती करत निवडणूकही लढली खरी. पण या निवडणुकीत मनसेला फारसा करिश्मा दाखवता आलेला नाही, त्यांना फार यशही मिळालेलं नाही. उलट दारूण पराभवच सहन करावा लागला आहे.
भाजपच्या विजयाचा आणि रसमलाईचं कनेक्शन :
एका युजरने बीएमसी निकाल टॅग करत लिहीलं रसमलाई खा मित्रांनो… तर दुसऱ्याने आणखी एक मजेशीर फोटो टाकला.
Hello @RajThackeray, Kaisi lagi Rasmalai ? 😂#DevaBhauWins pic.twitter.com/8nnHULERkv
— Mudit Jain (@MuditJain_IN)
आता राज ठाकरे रसमलाईत डुबकी मारत असतील, असं लिहीत दुसऱ्या युजरने एक चिमटाच काढला.
राज ठाकरेंच्या नवीन रसमलई दुकानात आपले स्वागत आहे असं बीईंग पॉलिटिकल नावाच्या एका युजरने लिहीलं.
Welcome to Raj Thackeray’s new rasmalai shop!#BMCResults pic.twitter.com/21i5TaF7kB
— Being Political (@BeingPolitical1)
Hello @RajThackeray, Kaisi lagi Rasmalai ? 😂#DevaBhauWins pic.twitter.com/KmN2RMYeDT
— Ocean Jain (@ocjain4)
लई महागं पड़ली….#BMCResults pic.twitter.com/HubAnPUzrk
— Mukul Dekhane (@dekhane_mukul)
मात्र निकाल महापालिका निवडणुकांचा , विजय भाजपला मिळताना दिसतोय , मगसोशल मीडियावर लोक राज ठाकरे आणि रसमलाईची चर्चा का करत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडलाय. तसेच त्यातल्या अन्नामलाई यांच्याशी संबंध काय तेही अनेकांना कळत नाहीये.
काय आहे प्रकरण ?
खरंतर, हा संपूर्ण वाद अण्णामलाई यांनी मुंबईत दिलेल्या भाषणाशी आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेशी संबंधित आहे. महापालिका निवडणुकांदरम्यान भाजपचे तामिळनाडूमधील नेते के. अण्णामलाई हे मुंबईत प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्याने केलेल्या विधानाने नवा वाद निर्माण झाला होता. बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी (मुंबई हे महाराष्ट्रताल शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं) असं ते म्हणाले होते.
त्यावरून विरोधकांच्या हाती कोलीत मिळालं होतं. त्यावर राज ठाकरे यांनीही जोरदार टीका करत अण्णामलाई यांचं नाव बदलून “रसमलाई” करत त्यांची टर उडवली होती. “कोण तो रसमलाई? मुंबई महाराष्ट्राची नाही असं बोलतो,” असं म्हणत राज ठाकरेंनी त्याच्यावर टीका केली होती.
राज ठाकरे यांच्या याच विधानाचा दाखला देत सोशल मीडियावर अनेकांनी मजेशीर मीम्स टाकले आणि राज ठाकरेंनाही त्यात खेचलं. आता राज ठाकरे यांनी रसमलाईचं दुकानं उघडलं पाहिजे, असंही एका युजरने लिहीलं.