देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात भूगोल दिन साजरा
esakal January 17, 2026 08:45 AM

- rat१६p१८.jpg-
२६O१८१८२
देवरूख ः पक्षांकरिता प्रतिकात्मक घरट्याचे वितरण करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर व प्रा. शेट्ये, प्रा. राणे व उपप्राचार्य डॉ. पाटील आणि विद्यार्थी.
----
विद्यार्थांकडून ३० हजार बीज संकलन
आठल्ये-सप्रे महाविद्यालय; वृक्ष संवर्धनासाठीचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १६ ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील भूगोल विभागाच्यावतीने भूगोल दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भौगोलिक घटकांचे संवर्धन करणे, जीवावरणाचा ऱ्हास थांबवणे, वृक्ष संवर्धन व वृक्षनिर्मिती करणे या सारखी उद्दिष्टे समोर ठेवून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी सुमारे ३० हजार बिजांचे संकलन करून त्यापासून बीजगोलक तयार केले. या बीजगोलकांचे निसर्गार्पण या निमित्ताने करण्यात आले.
नैसर्गिक अधिवासात असणाऱ्या पक्ष्यांकरिता निवारा म्हणून बनवण्यात आलेल्या सुरक्षित घरट्यांचे या वेळी वितरण करण्यात आले. भूगोल दिनाच्या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. सीमा शेट्ये, प्रा. स्वप्नाली झेपले यांची उपस्थिती लाभली. प्रा. मयुरेश राणे यांनी भूगोल दिन साजरा करण्यामागची भूमिका व महत्त्व स्पष्ट केले व विद्यार्थ्यांनी राबवलेल्या विविध अभिनव उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. ११वी कलावर्गातील आकांक्षा शिवगण हिने बीजगोलक व घरटी बनवताना आलेल्या अनुभवांचे कथन केले. उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील उपक्रमशील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते प्रतिकात्मक घरट्यामध्ये पक्षी ठेवून घरटी वितरणाचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांनी अंगीकारलेल्या पर्यावरणपूरक दृष्टिकोनाचा गौरव केला. विद्यार्थिनी अक्षरा कांबळे हिने आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ११वी कलावर्गातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.