प्रसिद्ध गायकाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गायकाला फोनवरून धमकी मिळली.
लॉरेन्स बिश्नोई गँगने 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
मनोरंजन सृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननंतर अनेक कलाकारांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी आली. ज्यामुळे बॉलिवूडवर संकटाचे सावट पाहायला मिळाले. अशात आता अजून एक सेलिब्रिटी बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. पंजाबी प्रसिद्ध गायक बी. प्राकला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने 10 कोटी रुपयांची मोठी खंडणी मागितली आहे.
View this post on InstagramA post shared by B PRAAK (@bpraak)
गायकबी. प्राकला मिळालेल्या धमकीमुळे संगीत, मनोरंजन क्षेत्रात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. "मला आठवड्यातून 10 कोटी रुपये द्या, नाहीतर मी खूप मोठे नुकसान करेन..." अशी धमकी बी. प्राकला मिळाली आहे. ही धमकी थेट बी. प्राकला देण्यात आली नसून त्यांचा मित्र आणि पंजाबी गायक दिलनूर बबलू यांच्याकडून देण्यात आली. दिलनूर बबलू मोहालीतील सेक्टर 99 येथील वन राईज सोसायटीमध्ये राहतात. धमकी मिळाल्यानंतर दिलनूर यांनी पोलीसस्टेशनला तक्रार दाखल केली आणि त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.
तक्रारीनुसार, दिलनूर बबलू यांना 5 जानेवारी रोजी दुपारी 3.11 वाजता परदेशी नंबरवरून दोन मिस्ड कॉल आले. दुसऱ्या दिवशी 6 जानेवारी रोजी दुपारी 2.24 वाजता त्याच नंबरवरून एक कॉल आला. पण त्याने तो उचलला नाही. त्यानंतर, तिला एक व्हॉइस मेसेज आला ज्यामध्ये कॉलरने स्वतःची ओळख 'आरजू बिश्नोई' अशी करून बी. प्राक यांना 10 कोटी रुपयांची व्यवस्था करण्याची मागणी केली.
View this post on InstagramA post shared by B PRAAK (@bpraak)
व्हॉइस मेसेजमध्ये सांगितल्यानुसार, पैसे देण्यासाठी एक आठवडा देण्यात आला आहे. जर पैसे दिले नाहीत तर बी. प्राक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. तो म्हणाला, "तुम्ही कोणत्याही देशात जाऊ शकता, जर तुम्ही आमच्यात सामील झाला नाही तर आम्ही तुम्हाला नष्ट करू..." दिलनूरने स्पष्ट केले की तो आणि बी. प्राक वारंवार शो आणि शूटिंगसाठी परदेशात प्रवास करतात, त्यामुळे त्यांची सुरक्षितता धोक्यात आहे.
आरजू बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे. जो सध्या परदेशात लपून आहे. असा संशय आहे की, ही धमकी लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडलेली आहे. दिलनूर बबलूने कॉलचे स्क्रीनशॉट आणि व्हॉइस रेकॉर्डिंग पोलिसांना दिली आहे. तसेच सुरक्षेची विनंती देखील केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Veen Doghantali Hi Tutena : घटस्फोटाची नोटीस पाहताच अधिरा बिथरली; थेट गेली टेरेसवर अन्..., 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट - VIDEO