विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे बॉलिवूडचे पावर कपल आहे.
विराट-अनुष्काने अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
विराट-अनुष्काने 5 एकर जमीन खरेदी केली.
बॉलिवूडचे पावर कपल विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अलिकडेच ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये मालमत्ता खरेदी केली आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अलिबागचे क्रेझ पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी अलिबागमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे.
View this post on InstagramA post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)
मीडिया रिपोर्टनुसार, विराट कोहलीआणि अनुष्का शर्माने सुमारे 37.86 कोटी रुपयांची 5.1 एकर जमीन खरेदी केली आहे. मालमत्तेच्या कागदपत्रांमधून ही माहिती समोर येते. जिराड गावात असलेली ही जमीनसमीरा लँड ॲसेट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक सोनाली अमित राजपूत यांच्याकडून खरेदी करण्यात आली होती.जमिनींसाठीचा करार 13 जानेवारी रोजी नोंदणीकृत झाला होता.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी त्यांनी अंदाजे 2.27 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. अहवालानुसार, विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने त्यांच्या वतीने सर्व कागदपत्रे हाताळली. यापूर्वी, असेही बोले जात होते की, विराट कोहली आणि अनुष्का शर्माने त्यांच्या 80 कोटी रुपयांच्या गुरुग्राम बंगल्याची देखभाल करण्याची जबाबदारी सोपवली होती.
View this post on InstagramA post shared by Viral Bhayani (@viralbhayani)
विराट कोहली आणि अनुष्का शर्माने अलिबागमध्ये ही दुसरी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 2022 मध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने रिअल इस्टेट डेव्हलपर समीरा हॅबिटॅट्सकडून सुमारे 8 एकर जमिनीच्या दोन स्वतंत्र मालमत्ता 19.24 कोटी रुपयांना विकत घेतल्या. त्यानंतर त्यांनी त्या जमिनीवर एक आलिशान घर बांधले आहे.
Dhanush - Mrunal Thakur : धनुष चढणार दुसऱ्यांदा बोहल्यावर, मृणाल ठाकुरशी बांधणार लग्नगाठ? तारीख आली समोर, वाचा नेमकं सत्य काय