वरठी (जि. भंडारा) : येथील सनफ्लॅग स्टील कंपनीतील एसएमएस विभागात काम करत असताना क्रेनवरून उतरताना पाय घसरल्याने संबंधित कामगार सुमारे ७० फूट खाली कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. मारुती भिवगडे (वय ४५, रा. पाचगाव) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.
Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास क्रेनवरून उतरताना पाय घसरून मारुती भिवगडे हा खाली पडला. या अपघातानंतर त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून भंडारा येथील डॉ. व्यास यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर संतप्त कामगाराचे कुटुंबीय व संतप्त गावकऱ्यांनी सनफ्लॅग कंपनीच्या फाटकासमोर निदर्शने सुरू केली.
मृताच्या कुटुंबाला मोबदला व एका सदस्याला कंपनीत नोकरी देण्याच्या मागणीसाठी कंपनीच्या मुख्य गेटसमोर मृतदेह आणून कंपनीचे प्रवेशद्वार अडविण्यात आले होते. तणावाची परिस्थिती लक्षात घेता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आमदार राजू कारेमोरे तसेच माजी आमदार चरण वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली.
माणुसकीला सलाम! कृष्णा नदीत उडी घेतलेल्या नवविवाहितेला जीवदान; कऱ्हाडमध्ये युवकांनी लावली प्राणाची बाजी, थरारक घटना..त्यांनी मृत कामगाराच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सनफ्लॅग कंपनीच्या व्यवस्थापनासोबत चर्चा केली. या चर्चेनंतर तोडगा निघाला. कंपनी व्यवस्थापनाने मृत कामगाराच्या कुटुंबाला ३२ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे व मृताच्या पत्नीला तत्काळ नोकरी देण्याचे तसेच मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यालाही नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर मृतदेह गावी नेण्यात आला असून अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत मारुती भिवगडे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.