नात्याला काळीमा फासणारी घटना! होमगार्ड मावसाचा मुलीवर अत्याचार; बाळापूर तालुक्यात खळबळ, 'ती' कायमच घाबरलेली..
esakal January 19, 2026 06:45 AM

बाळापूर : अल्पवयीन मुली सतत वासनेच्या बळी पडत असून बाळापूर तालुक्यात घडलेल्या घटनेने महीलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दहा वर्षीय मुलीचे नात्यातीलच होमगार्ड असलेल्या नराधमाने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने आरोपीच्या मुसक्या आवळत बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

बाळापूर पोलिस स्टेशन हद्दीतील बटवाडी गावात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. १६) रोजी या गावात यात्रा होती. या निमित्ताने दहा वर्षीय मुलगी नातेवाईकांकडे आली होती. एकीकडे यात्रा महोत्सव सुरू असताना दुसरीकडे या चिमुकलीवर अत्याचार होत होता.

शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी रामेश्वर मोतीराम जोगदंड हा पिडीत मुलीला पैशाचे आमिष दाखवून टिव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरात घेऊन गेला. व त्यानंतर तीच्यावर त्याने अत्याचार केला. पिडीतेने सायंकाळी तिच्या आईला घडलेला प्रसंग सांगितला. पिडीतेच्या आईने रात्री बाळापूर पोलिस स्टेशन गाठत फिर्याद नोंदविली. बाळापूर ठाणेदार प्रकाश झोडगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता बटवाडी गाव गाठत आरोपीचा शोध सुरू केला.

यात्रा असल्याने मोठी गर्दी होती. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक करून बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान या घटनेमुळे बाळापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

माणुसकीला सलाम! कृष्णा नदीत उडी घेतलेल्या नवविवाहितेला जीवदान; कऱ्हाडमध्ये युवकांनी लावली प्राणाची बाजी, थरारक घटना.. ‘तो’ वारंवार करत होता शोषण

आरोपी हा पिडीत मुलीचा जवळचा नातेवाईक आहे. यापुर्वी त्याने अनेकदा तिचे लैंगिक शोषण केले. काल शुक्रवारी पुन्हा त्याने तिच्यावर अत्याचार केला. अनेकदा शोषण होत असल्याने तीने हा प्रकार तिच्या आईला सांगीतला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.