PDR26B09357
पंढरपूर : चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी झालेले अरिहंत पब्लिक स्कूलचे विद्यार्थी.
..........
अरिहंत पब्लिक स्कूल, पंढरपूर
पंढरपूर : चित्रकला स्पर्धेमध्ये येथील अरिहंत पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. प्रशालेतील मैदानावर सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये विद्यार्थी तल्लीन होऊन चित्र काढताना दिसून आले. विविध विषयावरील चित्रांमध्ये विद्यार्थ्यांनी सप्तरंगी रंग भरले व बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले चित्र वेळ संपण्याआधी पूर्ण केले. चित्रकला स्पर्धेसाठी प्रशालेचे सचिव उज्वल दोशी, प्राचार्य सुप्रिया बहिरट, कलाशिक्षक सागर डोंगरे, स्नेहा कारंडे, वैशाली माने, श्वेता जगताप यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.