Mini Sri Lanka Maharashtra: पाहिलीत का महाराष्ट्रातील 'मिनी श्रीलंका'? एकदा गेलात की परत जाण्याची ओढ लागेल
esakal January 19, 2026 08:45 AM

Mini Sri Lanka Maharashtra: तुम्हालाही श्रीलंका जायचं आहे पण बजेट आड येतंय? मग चिंता करू नका. कारण महाराष्ट्रातच असं एक निसर्गरम्य ठिकाण आहे, जिथे गेल्यावर परदेशात आल्यासारखाच अनुभव मिळतो.

स्वच्छ निळाशार समुद्र, शुभ्र वाळू, नारळ सुपारीची हिरवळ आणि शांत वातावरण यामुळे ओळखली जाणारी ही जागा म्हणजेच महाराष्ट्रातील 'मिनी श्रीलंका कमी खर्चात निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायचा असेल, तर हे ठिकाण तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये नक्की असायलाच हवं

निळ्या समुद्राचं स्वप्नवत दृश्य

तारकर्लीचा समुद्र अतिशय स्वच्छ आणि नितळ आहे. दूरवर पसरलेलं निळसर पाणी आणि शांत लाटा पाहिल्यावर मन अक्षरशः प्रसन्न होतं. इथलं वातावरण गजबजलेल्या पर्यटनस्थळांपेक्षा खूप वेगळं आणि निवांत आहे.

HAL Recruitment 2026: HAL अप्रेंटिस भरती 2026 जाहीर; जाणून घ्या पात्रता आणि वॉक-इन अर्ज प्रक्रिया शुभ्र वाळूचा किकांना

तारकर्ली बीचची खासियत म्हणजे त्याची पांढरी, मऊ वाळू. पायाखालून सरकणारी वाळू आणि पारदर्शक पाण्यात दिसणारे सामुद्रतळाचे रंग श्रीलंकेतील समुद्रकिरनाऱ्याची आठवण करून देतात.

नारळ-सुपारींची हिरवीगार शाल

समुद्राच्या काठालगत उभ्या असलेल्या नारळ आणि सुपारीच्या उंच झाडांमुळे परिसर अधिकच निसर्गरम्य दिसतो. या झाडांमुळे इथे एक वेगळीच उष्णकटिबंधीय (ट्रॅपिकल) अनुभूती मिळते.

नदी आणि समुद्राचा मन मोहून टाकणारा संगम

देवबागमध्ये करळी नदी अरबी समुद्राला येऊन मिळते, हा क्षण प्रत्यक्ष पाहणं म्हणजे निसर्गाचं अद्भुत रूप अनुभवणं. बोटीतून या संगमाचा अनुभव घेता येतो, जो पर्यटकांना फार आवडतो.

जलक्रीडांचा थरार

तारकर्ली हे महाराष्ट्रातील स्कुबा डायव्हिंगसाठी ओळखलं जाणारं ठिकाण आहे. रंगीबेरंगी मासे, प्रवाळ (कोरल्स) पाहण्याची संधी इथे मिळते. याशिवाय स्नॉर्केलिंग, जेट स्की, बोट राईड अशा अनेक अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिटीज उपलब्ध आहेत.

शांत सुरक्षित आणि कुटूंबासाठी योग्य

गोवा किंवा परदेशी बीचेप्रमाणे इथे प्रचंड गर्दी नसते. त्यामुळे कुटूंब, मित्रमंडळी किंवा कपल्ससाठी हे ठिकाण सुरक्षित, स्वच्छ आणि निवांत सुट्टी घालवण्यासाठी उत्तम आहे.

Stay Warm Without Heater: हीटर न वापरता थंडी म्हणा बाय बाय; घरच्या घरी करा हे 5 स्मार्ट उपाय परदेशी अनुभव, तोही देशात

पासपोर्ट,व्हिसा किंवा मोठा खर्च न करता इथे परदेशासारखी मजा घेता येते. महाराष्ट्रात राहूनच श्रीलंकेसारखा फील हवा असेल, तर तारकर्ली- देवबाग हा उत्तम पर्याय आहे.

भेट देण्यासाठी योग्य काळ

ऑक्टोबर ते मार्च हा काळ या भागाला भेट देण्यासाठी सर्वात चांगला मानला जातो. या महिन्यात हवामान आल्हाददायक असतं आणि समुद्रही तुलनेने शांत असतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.