18539
परुळे आदिनारायण देवस्थानचा
शुक्रवारपासून रथसप्तमी उत्सव
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १८ ः परुळे येथील श्री देव आदिनारायण देवस्थानचा रथसप्तमी उत्सव २३ ते २५ जानेवारी या दरम्यान साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवारी (ता. २३) सकाळी ७ वाजता उत्सवाची सुरुवात, ८ वाजता लघुरुद्र व धार्मिक कार्यक्रम, दुपारी ४ वाजता वासुदेवशास्त्री जोशी यांचे कीर्तन, रात्री ८.३० वाजता दूर्वांकुर प्रोडक्शन दोडामार्ग सिंधुदुर्ग निर्मित ऐतिहासिक नाट्यप्रयोग ‘रायगडला जेव्हा जाग येते’ (लेखक वसंत कानेटकर, दिग्दर्शन गणेश ठाकूर), शनिवारी (२४) सकाळी ६ वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी ४ वाजता वासुदेवशास्त्री जोशी यांचे कीर्तन, सायंकाळी ७ वाजता ‘श्रीं’ची आरती, रात्री ८.३० वाजता गायन सेवा (गायक-केतकी भावे-जोशी, डॉ. तेजस्विनी देसाई, दाजी गोसावी, निवेदन-प्रदीप देसाई), रविवारी (२५) रथसप्तमी उत्सवानिमित्त सकाळी ६ वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२ वाजता तेजोनिधी भगवान श्री आदिनारायणाची रथाधिष्ठ महापूजा, १ वाजता महाप्रसाद, ३ वाजता सार्वजनिक हळदी-कुंकू, ४ वाजता प्रभंजन भगत (लोणी-शिर्डी) यांचे कीर्तन, सायंकाळी ७ वाजता ‘श्रीं’ची आरती, ७.३० वाजता शालेय स्पर्धा, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ, रात्री ९ वाजता ‘श्रीं’ची सवाद्य पालखी प्रदक्षिणा, ११ वाजता भाऊ नाईक (वेतोरे) यांचे कीर्तन, १.३० वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचे नाटक होणार आहे.