Jaysingpur Mahayuti : शिरोळ तालुक्यात महायुतीचं जमलं, पण चिन्हावर अडलं; निवडणुकीला रंगत
esakal January 19, 2026 07:45 PM

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात महायुतीने दंड थोपटले आहेत. रविवारी (ता. १८) रात्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची जयसिंगपूर येथे भेट घेऊन चर्चा केली.

प्राथमिक टप्प्यात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकदिलाने लढण्याचा निर्णय घेतला असला तरी दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, सर्वांनीच चिन्हाचा आग्रह सोडून स्थानिक पातळीवरील राजकीय संदर्भांचा विचार करून लढण्यावर चर्चा झाल्याचे समजते.

Sangli Election : पदयात्रा, मोटारसायकल फेऱ्या आणि घोषणांचा गजर; सांगली महापालिका प्रचाराचा शक्तिप्रदर्शनात शेवट

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी आमदार यड्रावकर यांची भेट घेऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक चर्चा केली. भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी पक्षांनी एकत्रितपणे लढण्यावर चर्चा करण्यात केली. तालुक्यातील राजकीय संदर्भांची आमदार यड्रावकर यांनी माहिती दिली.

एकत्रित लढण्यावर एकमत असले तरी चिन्हावरच लढण्यावर अद्याप दोन दिवस चर्चेचे गुऱ्हाळ कायम राहणार आहे. महायुती म्हणून लढण्याचे जवळपास निश्चित झाले असले तरी पक्षांचे चिन्ह दिसणार नसल्याने याप्रश्नी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेण्याबाबत मंत्री पाटील यांनी सांगितले.

Kolhapur Election : ‘विजयी होणाऱ्यालाच तिकीट!’ शिवसेना शिंदे गटाचा ठाम निर्णय; महापालिका निवडणुकीसाठी रणनिती ठरली

दोन दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांनी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. समविचारी मंडळींना बरोबर घेण्याचे त्यांनी सुतोवाच केले

असतानाच रविवारी महायुतीच्या नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. येत्या दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होऊन महाविकास आघाडी विरोधात महायुती, अशी लढत निश्चित होण्याची शक्यता आहे.  यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे, नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, मिलिंद भिडे, मिलिंद साखरपे, रमेश यळगुडकर आदी उपस्थित होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.