मुंबई महानगरपालिका प्रभाग समिती अध्यक्ष निवडणूक; कुठे बिनविरोध, कुठे थेट लढत? संपूर्ण चित्र स्पष्ट
इशान देशमुख March 05, 2026 01:43 AM

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 17 प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे. 11 ठिकाणी एकच अर्ज आल्याने अध्यक्ष बिनविरोध निवडले जाणार आहेत, तर 6 प्रभाग समित्यांमध्ये दोन उमेदवार रिंगणात असल्याने मतदान होणार आहे.

जी-नॉर्थमध्ये ठाकरे बंधूंमध्ये समझोता झाल्याची चर्चा असली तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अखेर कोण उमेदवारी मागे घेणार की दादरमध्ये ‘फ्रेंडली फाईट’ होणार, याकडे लक्ष लागले आहे.

BMC Ward Committee Unopposed Seats : 11 ठिकाणी बिनविरोध निवड

खालील प्रभाग समित्यांमध्ये एकमेव अर्ज दाखल झाल्याने मतदानाची गरज भासणार नाही

सी-डी – आकाश पुरोहित (भाजप)

के पश्चिम – रोहन राठोड (भाजप)

के-दक्षिण/के-उत्तर – प्रकाश मुसळे (भाजप)

पी-दक्षिण – श्रीकला पिल्ले (भाजप)

आर-दक्षिण – लीना देहरकर (भाजप)

आर-मध्य/उत्तर – प्रकाश दरेकर (भाजप)

एम-पश्चिम – आशा मराठे (भाजप)

एन – अश्विनी मते (भाजप)

जी-दक्षिण – पद्मजा चेंबूरकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

एच-पूर्व/पश्चिम – रोहिणी कांबळे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)

एल – विजेंद्र शिंदे (शिवसेना शिंदे गट)

या 11 पैकी भाजपाचे 8, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 2, तर शिवसेना (शिंदे गट) 1 अध्यक्ष बिनविरोध निवडले जाणार आहेत.

Direct Contest Wards : 6 प्रभाग समित्यांमध्ये मतदान

या 6 प्रभाग समित्यांमध्ये दोन उमेदवार आमनेसामने असून 5, 6 आणि 9 मार्चला मतदान होणार आहे.

एबीई – ज्ञानराज निकम (काँग्रेस) विरुद्ध रोहिदास लोखंडे (भाजप)

एफ-दक्षिण/उत्तर – मानसी सातमकर (शिवसेना) विरुद्ध श्रद्धा जाधव (शिवसेना ठाकरे गट)

जी-उत्तर (दादर) – जोसेफ कोळी (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध यशवंत किल्लेदार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)

पी-उत्तर/पूर्व – अजित रावराणे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार) विरुद्ध हैदरअली शेख (काँग्रेस)

एम-पूर्व – खैरनुसा हुसेन (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) विरुद्ध प्रज्ञा सदाफुले (शिवसेना)

एस आणि टी – साक्षी दळवी (भाजप) विरुद्ध सुरेश शिंदे (शिवसेना ठाकरे गट)

Tie Possibility : चिठ्ठीवर अध्यक्ष ठरण्याची शक्यता?

एस (भांडुप) आणि टी (मुलुंड) प्रभागांमध्ये महायुती आणि ठाकरे गट-आघाडी यांचे संख्याबळ समान असल्याने समसमान मते पडल्यास चिठ्ठीद्वारे अध्यक्ष निवडण्याची शक्यता आहे.

एबीई प्रभागात समाजवादी पक्षाची भूमिका निर्णायक ठरू शकते. त्यांनी महायुतीला साथ दिल्यास येथेही चिठ्ठीद्वारे अध्यक्ष निवडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवड झाली असली तरी 6 प्रभाग समित्यांमध्ये रंगणारी थेट राजकीय लढत आणि काही ठिकाणी चिठ्ठीची शक्यता यामुळे या निवडणुकीकडे सर्वच पक्षांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.