कोल्हापूर : ‘समरजितसिंह घाटगे आमच्यासोबत महायुतीच्या बैठकीत होते. त्यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांचा भाजप प्रवेश केवळ औपचारिकता आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले.
समरजितसिंह घाटगे हे पूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटात) मध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते पुन्हा स्वगृही परतणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, प्रवेशासंदर्भात निश्चित माहिती पुढे येत नव्हती.
Malegaon Municipal Election Results : विधानसभेला 162 मतांनी पराभव स्वीकारलेल्या माजी आमदारानं मालेगावात जिंकल्या 35 जागा, 'एमआयएम'ला केलं चितपटदरम्यान, नगरपालिका निवडणुकीत त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगण्यावरून हातमिळवणी केली. या घटनेमुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. आज महायुतीच्या बैठकीत ते दिसल्याने पत्रकारांनी त्यांच्या प्रवेशाबाबत मंत्री पाटील यांना विचारले.
Ichalkaranji Election Result : इचलकरंजीत आवाडे–हाळवणकर यांची जोडी ठरली गेमचेंजर! दोघांना मिळणार मंत्रिपद-विधान परिषदेचं तिकीट, 'इतक्या' जागांवर मिळवला विजयत्यावर मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या जागा वाटपाची महायुतीची बैठक होती. त्यामध्ये समरजितसिंह घाटगे आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते. कागलमध्ये त्यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेची निवडणूक ‘कमळ’ चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश ही केवळ औपचारिकता आहे, तो कधीही होऊ शकतो.’