प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली.
गायकाने हॉस्पिटलमधून फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूडचा गायक गेल्याकाही दिवसांपासून आजारी आहे.
प्रसिद्ध गायक अरमान मलिक कायम त्याच्या गाण्यामुळे चर्चेत असतो. त्याच्या कॉन्सर्टला चाहत्यांची तुफान क्रेझ पाहायला मिळते. अशात आता अरमानच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अरमान मलिक रुग्णालयात दाखल आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून चाहत्यांना हेल्थ अपडेट दिले आहेत.
अरमान मलिकची गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडली होती. त्याने रुग्णालयातील एक फोटोही शेअर केला. ज्यामुळे चाहत्यांना चिंता वाटली. मात्र अरमान मलिक आता पूर्ण बरा आहे. सध्या डॉक्टरांनी त्याला विश्रांतीघेण्यास सांगितले आहे. अरमान मलिकने रविवारी x वर (ट्विटरवर) हॉस्पिटलमधून स्वतःचा एक फोटो शेअर केला.
अरमान मलिकने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या हातात IV ड्रिप दिसत आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "गेले काही दिवस आजारी होतो. पण आता मी ठीक आहे. विश्रांती घेत आहे आणि रिचार्ज होतोय..." अद्याप अरमान मलिकचे रुग्णालयातदाखल होण्यामागचे कारण स्पष्ट झाले नाही.
armaan Malik
अरमान मलिकने इन्स्टाग्रामवर देखील दोन स्टोरी टाकल्या आहेत. एका स्टोरीमध्ये लिहिलं की, "या वर्षी तुम्हाला ज्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्यांच्या यादीत स्वतःचा समावेश करायला विसरू नका..." तर दुसऱ्या स्टोरीमध्ये त्याने हॉस्पिटलमधील त्याचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, "गेले काही दिवस चांगले गेले नाहीत..."अरमान मलिकचे चाहते त्यांच्या पोस्टवर कमेंट करून त्याला काळजी घेण्यासाठी सांगत आहेत. तसेच तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहे.
अलिकडेच अरमान मलिक आपल्या भावाला अमाल मलिकला पाठिंबा देताना बिग बॉस हिंदीमध्ये दिसला. दोघे भाऊ उत्तम गायक आहेत. अरमान मलिकच्या गाण्याचे चाहते दिवाने आहेत. प्रेक्षक अरमान मलिकच्या नवीन प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
Famous Director Passes Away : प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ब्रेन स्ट्रोकशी झुंज अपयशी, मनोरंजनविश्वावर शोककळा