एका रात्री सचिन अचानक घरी आला, त्यावेळी बायकोला बेडवर दोन मुलांसोबत… 4 महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज
Tv9 Marathi January 19, 2026 10:45 PM

उत्तर प्रदेश कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर चार महिन्यात पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. महत्वाचं म्हणजे दोघांचं लव्ह मॅरेज होतं. आरोपीने हत्येनंतर काही तासांनी महाराजपूर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे. महाराजपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील रुमा भागात न्यू हायटेक सिटी येथील मुस्कान रुग्णालयाच्या वर बनवलेल्या एका भाड्याच्या घरात ही हत्या झाली.

पोलिसांनुसार आरोपीसचिन सिंह फतेहपुर जिल्ह्यातील माहनपुर गावचा रहिवाशी आहे. शनिवारी रात्री तो रडत पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याने स्वत:हून गुन्ह्याची कबुली दिली. साहेब, मी माझ्या पत्नीचा गळा आवळलाय. तिचा मृतदेह घरी चादरीत गुंडाळून ठेवला आहे. त्याच्या तोंडून हे ऐकताच पोलीस स्टेशनमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरु केली. आरोपी सचिनने गुन्ह्यामागची सगळी पार्श्वभूमी सांगितली. ते ऐकून सगळेच स्तब्ध झाले.

अचानक 1 वाजता तो घरी परतला

सचिनने पोलिसांना सांगितलं की, चार महिन्यापूर्वी त्याने गावात राहणार्‍या श्वेता सिंहसोबत कुटुंबियांच्या मर्जीविरोधात जाऊन कोर्ट मॅरेज केलं. कुटुंबीय नाराज असल्याने दोघे सूरतला निघून गेले. सचिन एका प्रायवेट कंपनीत नोकरीला होता. एक महिन्यानंतर तो पुन्हा कानपूरला परत आला. महाराजपूरच्या रुमा भागात त्याने भाड्याचं घर घेतलं. सचिनने रिक्षा चालवायला सुरुवात केली. 13 जानेवारीला तो फतेहपूर चौडगरा येथे गेला होता. शनिवारी रात्री अचानक 1 वाजता तो घरी परतला.

सचिनच्या घरासमोरच राहतात

घरी परततचा सचिनच्या डोळ्यांनी जे पाहिलं, त्याचा पारा चढला. श्वेता दोन युवकांसोबत बेडवर नको त्या अवस्थेत होती. हे युवक जवळच्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. सचिनच्या घरासमोरच राहतात. रागात सचिनने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. पण श्वेता आणि युवकांनी मोबाइल त्याच्याकडून हिसकावून घेतला. त्याला मारहाण केली. आरडाओरडा होताच शेजाऱ्यांनी 112 वर कॉल डायल केला. पोलीस सर्वांना पकडून चौकीत घेऊन गेले. पोलिसांनी सचिन आणि श्वेताला इशारा देऊन घरी पाठवलं. पण युवकांना ताब्यात ठेवलं.

मी त्या दोघांसोबतच राहणार

घरी परत येताच सचिनचं श्वेतासोबत जोरदार भांडण झालं. श्नवेताने त्याला धमकी दिली. “सकाळपर्यंत त्या मुलांची सुटका करेन. पण तू राहणार नाही. तू भले मला मारुन टाकं. पण मी त्या दोघांसोबतच राहणार” असं तिने सांगितल. हे ऐकून संतापलेल्या सचिनने श्वेताचा गळा आवळला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. गुन्हा केल्यानंतर सचिन इथे-तिथे भटकत होता. अखेर त्याने पोलिसांसमोर जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.