Shivsena- NCP Symbol Hearing | शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
GH News January 19, 2026 08:10 PM

शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी ही 21 जानेवारीला होणार आहे. 21 जानेवारीला कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे, तसेच शिंदेंच्या सेनेतील आमदार अपात्रतेसाठीच्या याचिकेवरही सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. 21 तारखेलाच युक्तिवाद पूर्ण होऊन, निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जातंय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.