नाशिक: शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’ला गती देऊन लोकचळवळ वाढीसाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोमवारी (ता. १९) नाशिक जिल्ह्यात येत आहेत. दुगाव येथे सकाळी साडेआठला, तर निफाड तालुक्यातील जानोरीला दुपारी बाराला आणि उंबरखेडला दुपारी चारला भेट देऊन त्या ग्रामस्थांशी संवाद साधतील.
शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत गावे स्वयंपूर्ण आणि समृद्ध करण्यावर भर दिला जात आहे. ‘आपलं गाव, आपली जबाबदारी’ या माध्यमातून लोकचळवळ उभी करण्याचा मानस आहे. ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता, तंत्रज्ञानाचा वापर, करवसुली आदींचा दर्जा उंचावण्यासाठी गावा-गावांमध्ये ही स्पर्धा घेतली जाते.
तालुका, जिल्हा, विभागस्तरीय आणि राज्यस्तरापर्यंत पोहोचणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटींचे पहिले बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. उंबरखेड ग्रामपंचायतीने राबविलेले विविध उपक्रम, स्वच्छता अभियान आणि विकासकामांची पाहणी करण्यासाठी अभिनेत्री कुलकर्णी येतील. या वेळी त्या ग्रामस्थांशी संवाद साधतील.
शिव मंदिरातील मूर्तीची विटंबना! आरोपीला अटक करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन; पोलिस स्टेशनवर जनआक्रोश मोर्चा!आदर्श ग्रामपंचायतींच्या वाटचालीबाबत मार्गदर्शनही करणार आहेत. समृद्ध पंचायतराज अभियानाला ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने जनजागृती करण्यासाठी राजदूत (ब्रॅन्ड अम्बॅसिडर) अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे समृद्ध पंचायतराज अभियानात आता रंगत वाढेल.