भारत-पाकिस्तान एकाच दिवशी दोन वेळा येणार समोरासमोर! पहा संपूर्ण वेळापत्रक
Marathi January 20, 2026 03:24 AM

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. गेल्यावेळी हे दोन्ही संघ आशिया चषक 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवून जेतेपदाचा मान पटकावला होता. आता क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा भारत- पाकिस्तान सामन्याचा थरारा पाहायला मिळणार आहे. येत्या 15 फेब्रुवारीला एकाच दिवशी भारत- पाकिस्तान यांच्यातील दोन सामने पाहायची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळू शकते.

येत्या 7 फेब्रुवारीपासून आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला सुरूवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या केले जाणार आहे. भारतीय संघाचा स्पर्धेतील पहिला सामना अमेरिकेविरूद्ध होणार आहे. पण त्यानंतर 15 फेब्रुवारीला भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार पाहायला मिळणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल. हा सामना होणार हे आधीपासूनच ठरलेलं होतं.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत – पाकिस्तान होण्यापूर्वी आणखी एक सामना होणार आहे. हा सामना देखील 15 फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. थायलंडमध्ये एशिया कप महिला रायझिंग स्टार्स स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. या वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे की, 15 फेब्रुवारीला एकाच दिवशी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ दोन वेळेस आमनेसामने येणार आहेत. मुख्य बाब म्हणजे हे सामने एकाचवेळी खेळवले जाणार नाहीत. दोन्ही सामन्यांची वेळ ही वेगळी असेल, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना दोन्ही सामन्यांचा आनंद घेता येईल.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला येत्या 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत पुरुष क्रिकेटपटूंचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे थायलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेत महिला क्रिकेटपटूंचा बोलबाला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान आणि नेपाळ हे दोन्ही संघ भिडणार आहेत. तर भारतीय संघाचा पहिला सामना 13 फेब्रुवारीला यूएईविरूद्ध होणार आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारीला भारतीय संघाचा सामना पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. तर 17 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यात भारत आणि नेपाळ हे दोन्ही संघ भिडणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.