swt1910.jpg
18801
माणगाव ः उमेश गाळवणकर यांचा सत्कार सगुण धरी यांनी केला. यावेळी सुभाष सावंत, गोविंद साटम व इतर मान्यवर.
अनुभवांतूनच होतो माणूस सक्षम
उमेश गाळवणकर ः माणगाव यक्षिणी विदयालयात पारितोषिक वितरण
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय बेनगाव माणगाव प्रशालेचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण नुकतेच झाले. जीवनात येणारे अनुभव घेऊन सक्षम बना, असे प्रतिपादन यावेळी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे (कुडाळ) चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले.
व्यासपीठावर कॅप्टन विशेष अतिथी सुभाष सावंत, कार्यक्रमाचे अध्यक्ष माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सगुण धुरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शारदा पूजनाने झाली. विद्यार्थिनींनी मान्यवरांचे स्वरांच्या माध्यमातून स्वागत केले. मुख्याध्यापक गोविंद साटम यांनी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये शाळेचा वार्षिक अहवाल सदाशिव सावंत यांनी सादर केला.
सगुण धुरी यांनी श्री. गाळवणकर यांचा, कॅप्टन सुभाष सावंत यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष दत्ताराम जोशी यांनी, प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक साटम यांनी श्री. धुरी यांचा शाल व श्रीफळ देऊ सत्कार केला. मान्यवरांच्या हस्ते वर्षभरातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, चषक व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. वार्षिक पारितोषिक वितरणाचा अहवाल प्रशांत कांबळी सर यांनी सादर केला. कॅप्टन सावंत, श्री. धुरी यांनी मार्गदर्शन केले. माजी मुख्याध्यापक श्री. आकेरकर, संस्था सदस्य चंद्रशेखर जोशी, संस्था सचिव साईनाथ नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश रांगणेकर, शाळा समितीचे मेघश्याम पावसकर, सदस्य चंद्रशेखर जोशी, योगेश फणसळकर, माणगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक चंद्रकांत चव्हाण, माणगाव कॉलेजचे प्रा. श्रीकृष्ण सावंत, इंग्लिश मीडीयम प्रिन्सिपल नयना पाडगावकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैदेही भोगले यांनी केले. मुख्याध्यापक साटम यांनी आभार मानले.