Vaibhav Suryavanshi च्या निशाण्यावर शुबमन गिलचा रेकॉर्ड, विराटनंतर प्रिन्सला पछाडणार
Tv9 Marathi January 20, 2026 03:45 AM

आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त अशी कामगिरी केली आहे. भारताने सलग 2 विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. अंडर 19 टीम इंडियाने यूनायडेट स्टेट्‍स ऑफ अमेरिका आणि बांगलादेश या 2 संघांचा धुव्वा उडवला आहे. भारताने हे दोन्ही सामने डीएलएसनुसार जिंकले आहेत. दोन्ही संघाविरूद्धच्या सामन्यातील दुसऱ्या डावात पावसाचा व्यत्यय आला होता. भारताने 15 जानेवारीला यूएसएवर 6 विकेट्सने मात केली. तर भारताने 17 जानेवारीला बांगलादेशवर 18 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह पुढील फेरीत धडक दिली.

वैभवची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

अंडर 19 टीम इंडिया आता या साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध 24 जानेवारीला खेळणार आहे. भारताचा स्टार ओपनर वैभव सूर्यवंशी यूएसए विरूद्धच्या सामन्यात अपयशी ठरला. मात्र वैभवने बांगलादेश विरूद्धच्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं. वैभवने 72 धावांची खेळी केली. वैभवने या दरम्यान मोठा कारनामा केला.

वैभवने 72 धावांच्या खेळीसह विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला. वैभवने विराटचा लिस्ट ए क्रिकेटमधील युथ वनडेत सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक केला. त्यानंतर आता वैभवच्या निशाण्यावर शुबमन गिल याचा विक्रम आहे.

वैभव शुबमनला पछाडणार!

विराट कोहली याने अंडर 19 वनडे क्रिकेटमध्ये 28 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांसह 978 धावा केल्या होत्या. शुबमनने विराटचा हा विक्रम मोडीत काढला. वैभवच्या नावावर आता अंडर 19 वनडे क्रिकेटमध्ये 20 सामन्यांत 3 शतकांसह 1 हजार 47 धावांची नोंद आहे.

तर शुबमन गिल याच्या नावावर अंडर 19 वनडे क्रिकेटमध्ये 16 सामन्यांमधील 15 डावांत 5 शतकांसह 1 हजार 149 धावा आहेत. त्यामुळे वैभवला शुबमनचा अंडर 19 वनडेतील धावांचा विक्रम मोडीत काढण्यासाठी 103 धावांची गरज आहे. त्यामुळे वैभवला न्यूझीलंड विरुद्ध किंवा बाद फेरीत सामन्यात शुबमनचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

टीम इंडिया पहिल्या स्थानी

दरम्यान अंडर 19 टीम इंडिया बी ग्रुपमधून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. या ग्रुपमध्ये टीम इंडियासह यूएसए, न्यूझीलंड आणि बांगलादेश संघांचा समावेश आहे. टीम इंडिया या बी ग्रुपमधून सलग दोन्ही सामने जिंकणारी एकमेव आहे. तसेच टीम इंडिया अजिंक्य आहे. तसेच इतर तिन्ही संघांना अद्याप विजयाचं खातंही उघडता आलेलं नाही. यूएसएचा एका सामन्यात पराभव झालाय. तर यूएसए आणि न्यूझीलंडचा एक सामना रद्द झालाय. त्यामुळे यूएसए आणि न्यूझीलंडच्या खात्यात प्रत्येकी 1-1 पॉइंट आहे. तर बांगलादेशची स्पर्धेत पराभवाने सुरुवात झालीय.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.