IND vs NZ T20I : भारताची वर्ल्ड कपआधी ‘कसोटी’, न्यूझीलंड विरुद्ध लागणार कस, पाहा वेळापत्रक
GH News January 20, 2026 02:11 AM

यजमान न्यूझीलंडने भारतीय संघाचा 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवला. न्यूझीलंडने 18 जानेवारीला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतावर मात केली. न्यूझीलंडने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारताला 41 धावांनी पराभूत करत सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकला. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. न्यूझीलंडने यासह अनेक दशकांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला. न्यूझीलंडने भारतात एकदिवसीय जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तर शुबमन गिल कर्णधार म्हणून मायदेशतील पहिल्याच एकदिवसीय मालिकेत अपयशी ठरला.

त्यानंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचं आयोजन 21 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटची मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. मात्र भारताचा या मालिकेत चांगलाच कस लागणा आहे. न्यूझीलंडने भारताला एकदिवसीय मालिकेत पराभत केल्याने त्यांचा विश्वास दुणावलेला आहे. तर भारतासमोर वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या मालिकेत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे. अशात चाहत्यांना या मालिकेत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.