डान्स करा फिट राहा
Marathi January 20, 2026 11:25 AM

आपण जेव्हा आनंदात असतो किंवा एखाद्या लग्नसमारंभ, किंवा पार्टीत असतो तेव्हा म्युझिकवर थिरकून नाचून आनंद व्यक्त करत असतो. त्यामुळे मूड तर फ्रेश होतोच शिवाय शरिराची हालचालही होते. पण तुम्हाला माहीत आहे का नाचणे हा एक प्रकारचा शारिरीक व्यायाम आहे. ज्याला कार्डीयो एक्सरसाईज असे म्हणतात. जो केल्याने शरीरातील कॅलरीज वेगाने कमी होतात.

जर तुम्ही ३० मिनिट डान्स केलात तर तुमच्या शरीरातील कमीत कमी ५०० ते ८०० कॅलरिज कमी होतात. ज्यामुळे वजन कमी करणे सहज सोपं होऊन जातं. त्यामुळे पचनक्रियाही सामन्य होते. अन्नपचन होण्यास मदत होते. तसेच जर तुमचे वजन ६५ च्यावर असेल तर दिवसातून १५ ते २० मिनिट जरी डान्स केलात किंवा झुंबा केलात तरी बऱ्यापैकी कॅलरी बर्न होते. पण डान्स केल्याने फक्त वजनच कमी होण्यास मदत होत नाही तर त्याबरोबर इतर आरोग्यदायी फायदेही होतात. कोणते आहेत हे फायदे ते बघूया.

चांगली झोप

दिवसातील ३० मिनिट जरी तुम्ही डान्स केलात तरी त्यातून तुम्हाला दिवसभराची एनर्जी मिळते. मूड फ्रेश होतो. मनावरचं दडपण जात. त्यामुळे मनात सकारात्मक विचार येतात. मन एकाग्र होतं. दिवसभर लक्ष लावून काम करता येत. परिणामी रात्री शांत झोप लागते.

भूकेची समस्या

काहीजणांना भूक लागतच नसल्याची समस्या असते. जर अशा व्यक्तीने ३० तास जरी डान्स केला तरी त्यात उर्जा खर्च होते. त्यामुळे भूक-तहानही आपोआप लागते.परिणामी पचनशक्ती सुधारते. भूकेची समस्येचे आपोआपच निराकरण होते.

कारण प्रक्रिया सुधारणा

नाचल्यामुळे श्वसनप्रक्रीया सुधारते. नाचताना शरीराची हालचाल होते. त्यामुळे श्वासाचा वेग वाढतो. त्यामुळे फुफ्फुस निरोगी राहते.

स्नायू
नाचणे हा संपूर्ण शरीराला मिळणारा व्यायाम आहे. त्यामुळे स्नायू मजबूत होतात. जर तुम्ही झुंबा, साल्सा, पोल डान्स, बॅले डान्स करत असाल तर स्नायू मजबूत होतात.

वजन

नाचल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. त्यामुळे वजनही झपाट्याने कमी होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.