शिवसेना नाव अन् चिन्हाबाबात उद्या सुनावणी; उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागल्यास काय?, ॲड. असि
Marathi January 20, 2026 03:25 PM

शिवसेना राष्ट्रवादी पक्षाच्या नाव चिन्हावर सुनावणी शिवसेना (shivsena party symbol) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी उद्या (21 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे (मराठी) यांचा तर राष्ट्रवादी हा अजित पवारांचा (Ajit Pawar) पक्ष असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

राज्यात नुकत्याच नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवल्या. तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या. मात्र आता पुढील सुनावणीत शिवसेना नाव आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळाल्यास विविध प्रश्न उपस्थित राहतील. या सगळ्या प्रकरणावर अॅड असिम सरोदे यांनी एक्सवर ट्विट केलं आहे.

असिम सरोदे काय म्हणाले? (Asim Sarode Shivsena Ncp Party Hearing)

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह..सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी Reach होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न- जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील.सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल…असं असिम सरोदे यांनी म्हटलं आहे.

गेल्या तीन वर्षांपासून याचिका प्रलंबित- (शिवसेना राष्ट्रवादी पक्षाची सुनावणी)

शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाचा, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 2022 साली एकसंध शिवसेनेतून फुटलेल्या एकनाथ यांचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray-Uddhav Thackeray Meet: महापालिकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे-राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार; तारीख आणि ठिकाणही ठरलं!

BMC Election Results 2026: बीएमसीतील सत्ता गेली पण ठाकरेंचा मुंबईतील पाया भक्कम, मराठी माणूस पाठीशी उभा राहिला

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.