Soham Bandekar: एका पाणीपुरीने सुरु झालेली सोहम बांदेकर आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत येऊन पोहोचली. 2 डिसेंबर 2025 मध्ये मोठ्या थाटात सोहम आणि पूजा यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. लोणावळ्यात मोठ्या जल्लोषात लग्न झालं. त्यानंतर मुंबईत रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आली. तेव्हा अनेक कलाकार आणि राजकीय नेते देखील उपस्थित राहिले होते. सांगायचं झालं तर, पूजा आणि सोहम यांच्या नात्याची सुरुवात कशी झाली. नातं लग्नापर्यंत कसं पोहोचलं आणि लग्नानंतर वेगळं राहण्याच्या निर्णयाबद्दल नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सांगितलं.
मुलगा सोहम याच्या लग्नापूर्वी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी सांगितलं होतं की, लग्नानंतर सोहमला सांगितलं आहे, वेगळं राहून छान संसार कर… अशात सोहम याने देखील लग्नानंतर वेगळं राहण्याच्या निर्णयावर मोठं वक्तव्य केलं. सोहम म्हणाला, ‘आईच्या वक्तव्यानंतर चर्चांमुळे असं वाटतं की, तो निर्णय आमच्यावर लादण्यात आला आहे. पण असं काहीही नाही.’
पुढे सोहम म्हणाला, ‘आमचं मूळ घर मुंबईत पवईमध्ये आहे आणि आम्ही मलाडमध्ये लग्नानंतर शिफ्ट झालो… वेगळं राहायचं असतं तर, पवईत घर पाहिलं असतं… पण पूजा आणि मला दोघांना कामाच्या दृष्टीने जिथे जवळ पडेल तिथे घर भाड्याने घ्यायचा निर्णय झाला. जवळपास आम्ही दोन महिने घर शोधत होतो… भाड्याने आम्ही घर घेतलेलं आहे. भाडं आणि सामानाचं पूजा बघते… बाकी इतर गोष्टी मी पाहतो…’ असं देखील सोहम म्हणाला.
सुचित्रा बांदेकर काय म्हणाल्या होत्या?मुलाच्या लग्नाबद्दल सुचित्रा बांदेकर म्हणालेल्या, ‘मला असं वाटतं उगाच कशाला वेळ काढायचा, मुलांनी लवकर सेटल झालं पाहिजे असं मला वाटतं. आयुष्याची छान इनिंग सुरु होते. आदेश यांच्या आईचं म्हणणं आहे की, लग्नानंतर मुलांनी वेगळं राहायला हवं. कारण त्यांना गोष्टी कळतात. तुमचा संसार तुम्ही करा. मी सोहमला सुद्धा सांगितलं होतं, लग्नानंतर वेगळं घर शोधायला. काही लागलं कर आम्ही आहोतच पण, त्यांना त्यांचं कळलं पाहिजे. मी इतकी वर्ष माझं घर सांभाळलेलं आहे आता तुम्ही स्वतःचं करा…’ असं देखील सुचित्रा म्हणाल्या होत्या.