राज्यभरात महापालिका निवडणूक झाली, निकालही लागला. पण अनेक महापालिकांमध्ये महापौर पदावरून तर काही ठिकाणी आकड्यांच्या खेळांमुळे रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोडेबाजार रंगल्याची शक्यता वर्तवली जाते. 29 महापालिकांचे निकाल लागले असले तरी नऊहून अधिक महापालिकांमध्ये बहुमताचा आणि सत्तेचा पेच फसला आहे. अनेक नगरसेवक बिनविरोध करूनही महायुतीला महापौरपदाचा पेच फसला आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात ठाकरे बंधूंच्या नगरसेवकांना महत्व आलं आहे. 122 पैकी शिंदेंच्या सेनेला 53, भाजपला 50, ठाकरेंच्या शिवसेनेला 11, मनसेला 5, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पावर गाठलं 01 जागा मिळाली आहे. बहुमत महायुतीला असलं तरी महापौर पदासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत.