Sanjay Raut | दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान; संजय राऊतांचा हल्लाबोल
GH News January 20, 2026 04:11 PM

राज्यातील महापालिका निवडणूक संपल्यानंतर आता महापौरपदाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईच्या महापौरपदाकडे तर सर्वाधिक लक्ष वेधलं गेलं आहे. मुंबईचा महापौर कोण होणार? भाजपचा की शिंदे गटाचा? महापौरपदाचा फॉर्म्युला काय असणार? की ठाकरे गटाचा महापौर होणार? या ना अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. आता तर मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय हा दिल्लीत होणार का? या संदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरवला जाईल, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चकरा माराव्या लागत आहेत, अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे. ‘दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणार हा महाराष्ट्राचा अपमान आहे’ असं संजय राऊत म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.