Nagpur News: दुर्दैवी घटना! लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू; कामठी तालुक्यातील घटना, मृतदेहासह ठिय्या आंदोलन..
esakal January 20, 2026 04:45 PM

कामठी : तालुक्यातील कवठा येथील ट्रुफॉर्म टेक्नो प्रॉडक्ट प्रा. लि. या कंपनीतील निष्काळजी कारभारामुळे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृतदेहासह कंपनीच्या द्वारासमोर ठिय्या आंदोलन केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आर्थिक मदतीचे आश्वासन मिळाल्याने अखेर परिस्थिती नियंत्रणात आली.

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्यात ‘माण-विद्यापीठ चौक’ मेट्रो चाचणी यशस्वी; एकोणीस किलोमीटरचे काम पूर्ण, मार्चअखेरपर्यंत मार्ग होणार खुला..

कन्हान येथे राहणारे प्रमोद नत्थुजी बोराडे (वय ४५) हे नेहमीप्रमाणे रविवारी (ता.१८) रात्री कामावर गेले होते. काम सुरू असताना अचानक लोखंडी प्लेट त्यांच्या पोटावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. सोमवारी (ता.१९) सकाळी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणला असता नुकसानभरपाईच्या मागणीवरून नातेवाईक व कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला.

वातावरण चिघळत असल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनानंतर नातेवाईक व कामगारांनी मृतदेहासाठी असलेली रुग्णवाहिका थेट कंपनी परिसरात नेली. यावेळी कोराडी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

MPSC Success Story: गटविकास अधिकाऱ्यांची एमपीएससीत यशस्वी झेप; सोनल शहांची जीएसटी असिस्टंट कमिशनरपदी निवड, नाेकरी करत यशाला गवसणी!

कामठीचे तहसीलदार गणेश जगदाळे यांनी नायब तहसीलदार अमर होंडा यांना घटनास्थळी पाठवून मध्यस्थी केली. चर्चेनंतर मृतकाच्या कुटुंबाला २.५ लाख रुपयांची मदत तसेच कामगार विभागाच्या नियमानुसार मदत देण्याचे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आले. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.