Crime News : एका भयानक घटनेने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) जगाला हादरवले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये ग्रीनविच येथे ५६ वर्षीय स्टीन एरिक सोएलबर्ग याने आपल्या ८३ वर्षीय आई सुझान एबर्सन अॅडम्स यांची हत्या केली आणि नंतर स्वतःचा जीव घेतला. आता या प्रकरणात चॅटजीपीटीला (OpenAI चा चॅटबॉट) थेट जबाबदार धरले जात आहे. मृत महिलेच्या इस्टेटने दाखल केलेल्या खटल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
खटल्यानुसार, सोएलबर्ग गेल्या अनेक महिन्यांपासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याला पॅरानॉइड भ्रम होत होते. आई त्याला विष देऊन मारण्याचा किंवा त्याच्यावर हल्ला करण्याचा कट रचत आहे असा विश्वास वाटत होता. या भ्रमांना आव्हान देण्याऐवजी चॅटजीपीटीने त्यांना अधिक बळकट केले असा गंभीर आरोप आहे. तो दररोज तासन्तास चॅटजीपीटीशी बोलत असे. चॅटबॉटने त्याच्या शंका खऱ्या असल्यासारखे उत्तर दिले, प्रिंटर किंवा बिलामधील चिन्हे डेमॉनिक असल्याचे सांगितले आणि सुरक्षेच्या बहाण्याने भ्रम वाढवले. यामुळे त्याची स्थिती आणखी बिकट झाली आणि शेवटी हिंसक कृत्य घडले.
12 minutes 46 seconds अन् 9 minutes 44 seconds MMS Original Link नेमकी आहे तरी काय? ओपन करताच सुरू होतोय सगळा खेळ..कुटुंबीयांना याची कल्पना नव्हती. सोएलबर्ग अधिकाधिक एकटे पडत गेले, विचित्र वागणूक दाखवू लागले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला सोशल मीडियावर व्हिडिओ सापडले, ज्यात वडील लांबलचक चॅटजीपीटी संभाषणे स्क्रोल करताना दिसत होते. मात्र हे चॅट्स ओपनएआयने उघड केलेले नाहीत.
या प्रकरणाने इलॉन मस्कची रागाने तीळपापडी झाली आहे . X वर त्यांनी हे "शैतानी" (demonic) असल्याचे म्हटले. AI माणसांसारखे वागू लागले आहे, भ्रमांना प्रोत्साहन देऊ नये, काय सत्य आहे ते शोधणारे असावे, असे ते म्हणाले. मस्क यापूर्वी ओपनएआयच्या सुरक्षिततेवर टीका करत आहेत.
Blaze Duo 3 : लोकप्रिय कंपनीचा धमाका! 16,999 रुपयांत डबल स्क्रीनवाला मोबाईल लाँच; देशी ब्रँडने उडवली विदेशी कंपन्यांची झोपओपनएआयने या घटनेला हृदयद्रावक म्हटले आणि खटल्याचा आढावा घेत असल्याचे सांगितले. कंपनी म्हणते, Chatgpt भावनिक त्रासात मदत करण्यासाठी आणि वास्तविक समर्थनाकडे निर्देश करण्यासाठी डिझाइन केले आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित संभाषणांसाठी सुरक्षा उपाय मजबूत केले जात आहेत.
हे प्रकरण एआयच्या जबाबदारीचा पहिला मोठा कायदेशीर चाचणी आहे. एआय चॅटबॉट्स सामान्य होत असतान third-party harm आणि सुरक्षिततेचे मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. तज्ञ म्हणतात हे वाद आणखी तीव्र होईल आणि एआय कंपन्यांना कठोर नियमांचा सामना करावा लागेल.