Viral Video : पनवेल रेल्वे स्थानकावर भारतीय खेळाडूंसोबत गैरवर्तन! ट्रेनमधून उतरवले अन् पाच तास तात्कळत उभं राहण्यास भाग पाडलं, नेमकं काय घडलं?
esakal January 20, 2026 04:45 PM

Panvel station incident with national record holder athlete: क्रिकेटपटू सोडले तर भारताच्या इतर खेळाडूंना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. देशातील अव्वल पोल व्हॉल्टर्स ( बांबू उडीपटू) देव मीना आणि कुलदीप यादव यांना पनवेल रेल्वे स्थानकावर रेल्वेतून बाहेर उतरवण्यात आले आणि त्यांना जवळपास ५ तास स्थानकावरच तात्कळत उभं रहावं लागले. या घटनेमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. तिकीट तपासनीसाने दोन्ही खेळाडूंना सांगितले की, त्यांना त्यांचे पोल रेल्वेतून घेऊन जाण्याची परवानगी नाही आणि म्हणून त्यांनी त्यांना उतरवले.

मीना आणि यादव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यांनी लिहिले की, ते सुमारे पाच तास पनवेल स्टेशनवर अडकले होते, अधिकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होते की त्यांच्या खेळासाठी बांबू आवश्यक आहेत, परंतु रेल्वे अधिकाऱ्यांनी ऐकण्यास नकार दिला.

कुलदीपने X वर लिहिले की, "आपल्या देशात खेळांना कोणीही जास्त महत्त्व देत नाही, म्हणून आपले खेळाडू खेळांमध्ये पदके जिंकण्यात मागे राहतात. देशातील अव्वल खेळाडू बांबू उडीपटू वीणू मीना आणि कुलदीप यादव हे रेल्वेत त्यांचे पोल घेऊन प्रवास करत होते. म्हणून टीटीईने त्यांना रेल्वेमधून खाली उतरवले. आता, अशा टीटीईंना तात्काळ बडतर्फ करावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी, कारण असे टीटीई ट्रेनला त्यांच्या वडिलांची मालमत्ता मानतात."

Viral Video : गौतम गंभीर हाय हाय...! चाहत्यांची नारेबाजी, विराट कोहलीची रिअॅक्शन होतेय व्हायरल; जाणून घ्या सत्य

स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म एनएनआयएसनेही या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, "जर एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूलाही टीटीईच्या इच्छेनुसार ट्रेनमधून उतरण्यास भाग पाडले जाऊ शकते, तर ज्युनियर खेळाडूंना त्यांच्या प्रवासादरम्यान किती त्रास सहन करावा लागतो याची कल्पना करण्यासारखी आहे."

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.