कोल्हापूर : शहरात वाहनांची संख्या वाढली; पण रस्ते तेवढेच आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यामुळे शहरातील ध्वनी प्रदूषणाची पातळीही वाढली असून, याचा सर्वाधिक धोका रुग्णालयांना आहे.
शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्राचे विद्यार्थी सूरज वेखंडे यांनी याबाबत संशोधन केले. त्यातून शहरातील ३१ रुग्णालयांच्या परिसरात ध्वनी मर्यादा ओलांडली गेली आहे. सूरज याने केलेल्या संशोधनाचा निबंध ‘इंटरनॅशनल जर्नल फॉर मल्टिडिसिप्लिनरी रिसर्च’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.
Pollution : ‘प्रदूषणामुळे दर वर्षी दहा लाख मृत्यू’; जागतिक बँकेच्या अहवालावरून जयराम रमेश यांची केंद्रावर टीकासूरजने २०२३ मध्ये शहरातील ध्वनी प्रदूषणावर संशोधन केले. ‘स्टडी ऑफ नॉईज पोल्युशन इन सायलेंट झोन इन कोल्हापूर सिटी’ असे या संशोधनाचे नाव आहे. या अंतर्गत शांतता क्षेत्रात येणाऱ्या रुग्णालयांच्या परिसरात ध्वनी मापन यंत्राद्वारे ध्वनीची पातळी नोंदविली.
सकाळी, रात्री अशा दोन्हीवेळी ही पातळी घेतली. त्यातून शहरातील ३१ रुग्णालयांच्या परिसरात ध्वनीची पातळी निर्देशांकापेक्षा अधिक असल्याचे समोर आले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने निर्धारित केलेल्या निर्देशांकानुसार ध्वनी मर्यादा ही दिवसा ५० डेसिबल (ए) पर्यंत, तर रात्री ४० डेसिबल (ए) पर्यंत असली पाहिजे. मात्र, शहरातील शांतता क्षेत्रात आणि रुग्णालयांच्या परिसरात यापेक्षा अधिक ध्वनीचे प्रमाण संशोधनातील सर्वेक्षणामध्ये दिसले.
Kolhapur Pollution : मातीचा बंधारा ठरला निरुपयोगी; नाल्यातील सांडपाणी थेट रंकाळा तलावातपर्यावरणशास्त्र प्रमुख प्रा. डॉ. असावरी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले. ध्वनीची मर्यादा राखण्यासाठी वाहनचालकांनी ध्वनी मर्यादा पाळणे आवश्यक आहे. तसेच वृक्षाच्छादन वाढविल्यास ध्वनी प्रदूषणाची तीव्रता कमी होईल. शांतता क्षेत्रातही ध्वनी मर्यादा ओलांडली जाणे हे अत्यंत धोकादायक आहे.
- सूरज वेखंडे, संशोधक रुग्णालयाच्या आतील परिस्थितीही चिंताजनक
रुग्णालयाच्या परिसरात ध्वनी मर्यादा ओलांडलेली आहे. मात्र, त्याचा परिणाम रुग्णालयाच्या आतील ध्वनीच्या पातळीवरही होतो. बहुतांशी रुग्णालयात आतील ध्वनीचे प्रमाण ध्वनी मर्यादेपेक्षा जास्त आहे. याचा परिणाम रुग्णांच्या उपचारांवरही होतो.
वॉर्ड परिसर सरासरी ध्वनी मर्यादा (डेसिबलमध्ये)
ए शिवाजी पेठ, टिंबर मार्केट,
क्रशर चौक, रंकाळा, हरिओमनगर,
सानेगुरुजी वसाहत सकाळी (६८.३) - रात्री (६५.६)
बी मंगळवार पेठ, बेलबाग,
शास्त्रीनगर, मंगेशकरनगर,
वारे वसाहत, संभाजीनगर सकाळी (७६,५) - रात्री (६५.७)
सी गंगावेश, महापालिका इमारत,
कुंभार गल्लीचा काही भाग सकाळी (७४.५) - रात्री (६९.८)
डी जुना बुधवार पेठ, पाडळकर मार्केट,
ऋणमुक्तेश्वर, मस्कुती तलाव,
पंचगंगा तालीम सकाळी (७०.२) - रात्री (६०.५)
ई राजेंद्रनगर, प्रतिभानगर, राजारामपुरी,
टाकाळा, विक्रमनगर, रुईकर कॉलनी,
बावडा, कदमवाडी सकाळी (६५.५) - रात्री (५२.४)