Mumbai News : मुंबईत धावत्या बसने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली, पहा VIDEO
Saam TV January 21, 2026 04:45 AM
  • कांदिवलीत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला आग

  • मेट्रो लाईन ७ च्या पुलाखाली घडली घटना

  • आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली घटना

  • बस पूर्णतः जळून खाक, व्हिडिओ व्हायरल

  • सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

संजय गडदे,मुंबई

Mumbai Western Express Highway Private Bus Fire मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. कांदिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर धावत्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. मेट्रो लाईन ७, रेड लाईनच्या पुलाखाली आज सकाळी १०:०१ वाजता ही घटना घडली. बस आगीत जळून खाक झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या झपाट्याने व्हायरल होत आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

मुंबईतील मालाड पूर्वेकडील बोरिवलीकडे जाणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया ब्रिजजवळ आज सकाळी एका खासगी बसला आग लागली. आग लागल्यानंतर बसने काही क्षणातच धगधगत पेट घेतला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. सर्व प्रवाशांना वेळेवर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने मोठ्या मेहनतीनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.

Shocking : धक्कादायक! दुचाकीवरून जाताना गळा कापला अन् खाली कोसळले , चिनी मांजाने घेतला ऑर्थोपेडिक सर्जनचा जीव

बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची पुढील चौकशी अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. घटनेमुळे काही काळ वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती, परंतु नंतर वाहतूक पोलिसांनीती व्यवस्थापित केली. आगीचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, मेट्रो पुलाखाली पिवळी बस जळताना दिसत आहे. गाडी जळत असताना त्यातून दाट काळा धूर निघताना दिसत आहे. कोणताही अपघात टाळण्यासाठी दोन्ही बाजूंची वाहतूक हळूहळू आणि काळजीपूर्वक चालताना दिसत आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक पोलिसआणि इतर अधिकारी वाहतूक व्यवस्था नियंत्रित करताना दिसत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.