अकोल्यातील किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट; 10 आरोपींना जन्मठेप तर 5 जण निर्दोष
Marathi January 21, 2026 05:25 PM

अकोला किसनराव हुंडीवाले खून प्रकरण : अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष आणि अकोल्यातील प्रॉपर्टी व्यावसायिक किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणाचा आज (21 जानेवारी) जिल्हा सत्र न्यायालयात अंतिम युक्तीवाद पार पडला. तब्बल दहा जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 6 मे 2019 रोजी पोलीस अधिक्षकांच्या शासकीय बंगल्याबाजूला असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात हूंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती. हत्या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील 5 जणांचा समावेश होता. यामध्ये पती आणि निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे, मुलगा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा तत्कालिन प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू गावंडे, रणजीत गावंडे, धीरज गावंडे, प्रल्हाद गावंडे, दिनेश राजपुत, प्रतीक तोंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, मयूर अहिर, सूरज गावंडे यांचा समावेश आहे.

Akola Crime News : उज्वल निकम सरकारी पक्षाचे वकील, 10 आरोपींना जन्मठेप, पाच जणांची निर्दोष मुक्तता

दरम्यानया प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम सरकारी पक्षाचे वकील होते. यात 10 आरोपींना जन्मठेप शिक्षा झालीय. तर फारसे पुरावे नसल्यामुळे पाच जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालावेळी या खटल्यातील विशेष सरकारी वकील खासदार उज्वल निकम उपस्थित होते.

किसनराव हुंडीवाले खून प्रकरण : नेमके प्रकरण काय?

अकोल्यातील गजबजलेल्या अशोक वाटिका चौकातल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात 6 मे 2019 रोजी दुपारी बारा वाजता हुंडीवालेंची हत्या झाली होती. लाकडी फर्निचर आणि आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरने किसनराव यांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने किसनरावांचा जागेवरच मृत्यू झाला होईल. यावेळी हुंडीवाले यांचे वकील नितीन धूत यांच्यावरही हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे, हे कार्यालय पोलिस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानाला अगदी लागूनच आहे. शिक्षण संस्थेच्या मालकी वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात होतं. हुंडीवाले आणि अकोल्यातील भाजप नेत्या आणि प्रथम महापौर सुमन गावंडेंच्या कुटुंबात हा वाद होता.

कोण होते किसनराव हुंडीवाले?

अकोल्यात सुप्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक

अकोल्यातील कौलखेड, खडकी भागातील राजकारणावर पकड

गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष

केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे जवळचे नातेवाईक

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.