सोन्या-चांदीच्या दराला झळाळी, गेल्या 24 तासात पुन्हा मोठी वाढ; मोडले सर्व रेकॉर्ड, वाचा आजचे दर
Marathi January 21, 2026 07:25 PM

सोन्याचांदीचा आजचा भाव: देशभरात सोन्या-चांदीचे भाव दिवसेंदिवस रेकॉर्ड ब्रेक करत (Silver Rate) असून चांदीच्या दराने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडित काढले आहेत. चांदीच्या दरात (Silver Price Today) गेल्या 24 तासात 15 हजार रुपयांची वाढ झाली आहे. खामगाव येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत आज चांदी 3 लाख 35 हजार रुपये प्रति किलो झाली आहे. परिणामी खामगाव येथील चांदीच्या बाजारपेठेत ग्राहक नसल्याने शुकशुकाट बघायला मिळतो आहे.

दुसरीकडे चांदी प्रमाणे सोन्याचं दरहे दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 9,000 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सोन्याच्या दराने दीड लाखांचा टप्पा पार केला असून सोन्याची किंमत आज म्हणजेच 21 जानेवारी रोजी 1.50 लाख रुपये पार केली आहे. आज (21 जानेवारी 2026) 24k कॅरेट सोन्याचा दर (सोन्याची किंमत) हा 3 दशलक्ष 23,000 इतका जीएसटी शिवाय (GST) आहे. तर 22k कॅरेट सोन्याचा दर (सोन्याची किंमत) हादशलक्ष ४१, ९८० इतका जीएसटी शिवाय (GST) आहे.

Silver Price Today : चांदीच्या दरात गेल्या 24 तासात 15 हजार रुपयांची

चांदीच्या दरातील वाढीचा परिणाम चांदीपासून तयार झालेल्या वस्तूंच्या मागणीवर देखील पाहायला मिळतो. चांदीच्या दागिन्यांची मागणी कमी झालीय.मात्र, दरवाढ झाल्यानं उलाढाल पहिल्या सारखी कायम आहे. विक्री मात्र घटल्याचं पाहायला मिळतंय. चांदीच्या दागिन्यांची मागणी सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीच्या तुलनेत चांगली आहे. गुंतवणूक म्हणून लोक सिल्वर ईटीएफमध्ये गुंतवणूक करत आहेत. प्रत्यक्ष चांदीची खरेदी कमी झालीय मात्र लोक आर्थिक गुंतवणूक म्हणून चांदीला प्राधान्य देत आहेत.  गेल्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सोन्याची किंमत 57,033 रुपये (75%) वाढली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,162 रुपये होती, जी 31 डिसेंबर 2025 रोजी 1,33,195 रुपये झाली. या काळात चांदीचा भावही 1,44,403 रुपये (167%) वाढला. 31 डिसेंबर 2024 रोजी एक किलो चांदीची किंमत 86,017 रुपये होती, जी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी 2,30,420 रुपये प्रति किलो झाली.

सोन्याचा दर कसा ठरतो?

सोने आणि चांदीचे दर दररोज निश्चित होतात. सोन्याच्या दरातील तेजी आणि घसरणीमागं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घटक कारणीभूत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचे दर अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित होतात. यामुळं डॉलर- रुपया विनिमय दरातील बदलाचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होतो. डॉलर मजबूत झाला तर रुपया कमजोर होतो आणि भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे दर वाढतात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.