शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह यावर सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी बोर्डावर येणे कठीण आहे. पण निर्णय लागेल तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच असं झालं तर शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल, शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील असा दावा वकील आणि कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल असं ही ते म्हणाले.
राज्य शासनाच्या योजनेसाठी बैलगाडीतून आली अप्सरा...राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 - 26 या महत्त्वाकांक्षी योजनेच्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान सोनालीने जिल्ह्यातील जयनगर, बामखेडा आणि श्रीरामपूर या ग्रामपंचायतींना भेटी देऊन तेथील विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
डोंबिवली मानपाड्यात जागा मालकाकडून रस्ता बंद; ११५ कुटुंबीयांचे हालडोंबिवली मानपाडा परिसरातील माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाने अचानक रस्ता बंद केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सुमारे ११५ कुटुंबीयांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून दैनंदिन वाहतूक ठप्प झाली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता अनेक वर्षांपासून वापरात असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवांसाठी हा एकमेव मार्ग आहे. मात्र जागा मालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय वाढली आहे.