टॅरिफपासून अर्ध्या जगाला दिलासा! डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत मोठी घोषणा, तब्बल इतके देश..
Tv9 Marathi January 22, 2026 02:45 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायमच चर्चेत असलेले नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील, याचा अजिबातच अंदाज नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडचा फोटो शेअर करत थेट अमेरिकेचा झेंडा दाखवला होता. त्यांना ग्रीनलँड हवा आहे. मात्र, स्वत: ग्रीनलँडकडून याला विरोध करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला ग्रीनलँडची जमीन हवी आहे आणि तो अमेरिकेचा भाग बनवायचा असल्याचे जाहीरपणे बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले.  डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, आम्हाला ग्रीनलँडवरील ताबा कोणताही बळजबरी करून हवा नाहीये. मात्र, ज्या देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील अतिक्रमणाला विरोध केला, त्या देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी क्षणात थेट 10 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. ग्रीनलँडकडूनही अमेरिकेच्या विरोधात लढण्याची तयारी करण्यात आली. ग्रीनलँडने नागरिकांना मोठे आव्हान करत थेट युद्धाची तयारी सुरू केली.

ग्रीनलँडबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर जगात खळबळ उडाली. आता डोनाल्ड ट्रम्प यांची ग्रीनलँडवरील आक्रमक भूमिका नरमल्याचे बघायला मिळत आहे. युरोपीय देशांना शुल्क लावण्याची धमकी पूर्णपणे त्यांनी मागे घेतली आहे. ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले की, दावोसमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांच्यासोबत माझी बैठक झाली. ही खरोखरच एक चांगली बैठक राहिली.

ग्रीनलँड आणि संपूर्ण आर्क्टिक प्रदेशाशी संबंधित भविष्यातील करारासाठी एक निर्णय झाला. 1 फेब्रुवारीपासून लागू होणारा 10 टक्के टॅरिफ जो नंतर 25 टक्क्यांपर्यंत वाढू शकला असता तो रद्द करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या पोस्टनंतर अनेक देशांनी सुटकेचा निश्वास घेतला. नाटो देश या परिस्थितीमध्ये एकत्र आल्याचे बघायला मिळाले. यामुळे त्यांच्यावरील टॅरिफ रद्द करण्यात आला.

अमेरिकेकडून यूरोपीयन देशांवर 1 फेब्रुवारीपासून 10 टक्के टॅरिफ आकारला जाणार होता. ग्रीनलँडच्या मुद्द्यामध्ये  डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स आणि ब्रिटनवर टॅरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला होता. तात्काळ हे आदेश काढत असून 1 फेब्रुवारीपासू हा टॅरिफ लावला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. ज्यामुळे मोठी खळबळ जगात उडाली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.