IND vs NZ 1st T20I : गौतम गंभीर फक्त एक चाल खेळले, सगळा गेम फिरवला, टीम इंडियाला सापडला मॅचविनर
Tv9 Marathi January 22, 2026 03:45 PM

IND vs NZ 1st T20I : भारतीय टीमचे हेड कोच गौतम गंभीर यांच्या रणनितीबद्दल बरच बोललं जातं. खासकरुन टेस्ट क्रिकेटमधील त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. पण वनडे आणि टी 20 चा विषय येतो, तेव्हा त्यांची प्रत्येक चाल अचूक ठरते. जे पहिल्या टी 20 सामन्यात दिसून आलं. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 मॅच आधी चर्चा सुरु होती की, रिंकू सिंहला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का?. रिंकूला संधी मिळणं कठीण आहे, असं अनेक रिपोर्टमध्ये म्हटलेलं. पण गौतन गंभीर यांनी त्या सर्व रिपोर्ट्सना चुकीच ठरवलं. पहिल्या टी 20 सामन्यासाठी असा बदल केला, ज्याने टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला.

पहिल्या टी 20 आधी असं म्हटलं जात होतं की, गौतम गंभीरहर्षित राणावरील विश्वास कायम ठेवतील. पण कोचने योग्य निर्णय घेतला. हर्षित राणाला बाहेर बसवून दोन वेगवान गोलंदाजांच्या कॉम्बिनेशनसह टीम मैदानात उतरवली. टीममध्ये अर्शदीप सिंहला संधी मिळाली. अर्शदीपने सुद्धा गंभीरचा निर्णय योग्य ठरवला. 4 ओव्हरमध्ये 31 रन्स देऊन 1 विकेट काढला. अर्शदीपने पहिल्याच ओव्हरमध्ये डेवॉन कॉनवेला बाद करुन न्यूझीलंडच्या टीमला अडचणीत आणलं. कॉनवेच धावा न करतच आऊट होणं ही भारतासाठी विजयी सुरुवात ठरली.

स्फोटक इनिंगमुळे टीम इंडियाच्या 238 धावा

आशिया कपनंतर रिंकू सिंह टीममध्ये आहे. रिंकूचा टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. गंभीर यांनी काल रिंकू सिंहचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला. पुढच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये रिंकू बॅकअप फलंदाज म्हणून नाही तर फिनिशर म्हणून खेळेल हे स्पष्ट संकेत दिले आहेत. गौतम गंभीर यांचा हा निर्णय रिंकू सिंहने योग्य ठरवला. रिंकूने फलंदाजी करताना 20 चेंडूत 44 धावा ठोकल्या. रिंकूने 4 चौकार आणि तीन षटकार लगावले. रिंकूच्या स्फोटक इनिंगमुळे टीम इंडियाला 238 धावांच्या विशाल लक्ष्यापर्यंत पोहोचता आलं.

लास्ट ओव्हरमध्ये 21 धावा

रिंकूने भारताच्या इनिंगच्या लास्ट ओव्हरमध्ये 21 धावा केल्या. दोन सिक्स आणि दोन फोरसह 21 धावा फटकावल्या. रिंकूच्या इनिंगने त्याला फिनिशर बनवून टाकलं. रिंकूने 20 इंटरनॅशनलच्या करिअरमध्ये 36 सामन्यात 45.69 च्या सरासरीने 594 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकं आहेत.

याच शब्दांनी रिंकूला फिनिशर बनवलं

रिंकू फलंदाजी करताना कोच गंभीर यांनी त्याला धावांचा इंटेट कायम ठेवण्याचा सल्ला दिलेला. आज अयशस्वी ठरलास तरी पुन्हा संधी मिळेल हा विश्वास त्याला दिलेला. गंभीरच्या याच शब्दांनी रिंकूला फिनिशर बनवलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.