मुंबई - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केलेले भ्रष्टाचाराबाबतचे वक्तव्य त्यांना अंगलट येण्याची चिन्हे आहेत. यंदा रायगडमध्ये शासकीय ध्वजवंदन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात करण्यात येणार असून याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
रायगडचे पालकमंत्रिपद स्थगित झाल्यापासून अलिबागमधील शासकीय ध्वजवंदनावरून शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. मात्र प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्यदिनी आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगडच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजवंदन करण्याचा मान देण्यात येत असे. मात्र, यंदा गोगावले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे.
‘विकास गोगावले यांना का अटक नाही?’
महाड - महाड नगर परिषद निवडणूक मतदानादरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले आणि पुतण्या महेश गोगावले यांना अद्याप अटक न झाल्याने न्यायालयाने रायगड पोलिसांना धारेवर धरले. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत.