Gautam Gambhir : विराट कोहली, रोहित शर्मा सोबतच्या वादाच्या मुद्यावर अखेर गौतम गंभीर यांनी सोडलं मौन, इशाऱ्यांमध्ये बरच काही गेले बोलून
Tv9 Marathi January 22, 2026 04:45 PM

मागच्या अनेक महिन्यांपासून भारतीय क्रिकेटमध्ये गौतम गंभीर यांचं चित्र खलनायकाच्या रुपात रंगवलं जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती, दोघांना देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक करणं एकूणच भारतीय क्रिकेटमध्ये जे काही चुकीचं होतय त्यासाठी गौतम गंभीर यांना जबाबदार धरलं जातय. अलीकडे कसोटी आणि वनडेमध्ये टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनासाठी कोच म्हणून गौतम गंभीर यांना जबाबदार धरण्यात आलं. कोहली आणि रोहित हे गंभीर यांना भारतीय क्रिकेट संघात नको यापाशी येऊन ही सर्व चर्चा थांबते. मैदानावर खरतर संपूर्ण संघ खेळतो. संघामध्ये एखाद-दुसरा बदल कोच आणि कॅप्टनच्या सहमतीने होते. पण पराभवानंतर कोच म्हणून गंभीर यांचीच चूक मीडियामधून सतत दाखवली जाते.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीसोबत गौतम गंभीर यांचे मतभेद असल्याच जे सतत म्हटलं जातं, त्यावर ते पहिल्यांदाच व्यक्त झाले आहेत. गौतम गंभीर यांनी शशी थरुर यांच्या पोस्टला रिप्लाय केला. पहिलं टि्वट काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी केलं होतं. मॅचच्या एक दिवस आधी नागपूरमध्ये ते गौतम गंभीरला भेटलं व त्याचं कौतुक केलं होतं. थरुर यांनी गौतम गंभीरच्या कामाचं कौतुक करताना इंग्रजीमध्ये एक मोठं लांबलचक टि्वट केलं. त्यात लिहिलेलं की, “नागपुरमध्ये माझा जुना मित्र गौतम गंभीरसोबत चांगली आणि मन मोकळी चर्चा झाली. मला वाटतं पंतप्रधानांनंतर भारतात दुसरं सर्वात कठीण काम टीम इंडियाचं कोण असणं आहे. कोट्यवधी लोक रोज त्यांना जज करत असतात. पण ते शांत राहून न घाबरता आपलं काम करत राहतात. त्यांच्या या गुणाचं कौतुक झालं पाहिजे, त्यांना शुभेच्छा”

Thanks a lot Dr @ShashiTharoor! When the dust settles, truth & logic about a coach’s supposedly “unlimited authority” will become clear. Till then I’m amused at being pitted against my own who are the very best! https://t.co/SDNzLt73v5

— Gautam Gambhir (@GautamGambhir)

गंभीरने या पोस्टमध्ये कोणाच नाव घेतलेलं नाही

त्यावर गौतम गंभीरने बुधवारी रात्री उशिरा उत्तर दिलं. “ज्यावेळी चर्चा थांबतील त्यावेळी कोचला जे अमर्याद अधिकार असल्याचं बोललं जातं, त्यामागचं सत्य आणि लॉजिक समोर येईल. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की, मला आपल्याच लोकांविरोधात उभं केलं जात आहे. वास्तवात ते सर्वोत्तम आहेत” गंभीरने हे एक्सवर पोस्ट केलं आहे. गंभीरने या पोस्टमध्ये कोणाच नाव घेतलेलं नाही. पण भरपूर काही बोलून गेलाय. गंभीरचा इशारा नेमका कोणाकडे आहे, यावर आता सोशल मीडियामध्ये चर्चा सुरु झाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.