स्वयंपाकघरातील डबे झालेत पिवळसर आणि चिकट? करा हे 3 सोपे उपाय होतील चमकदार
Tv9 Marathi January 24, 2026 11:45 PM

आपण जेवणामध्ये विविध प्रकारचे पदार्थ खातो आणि ते विविध मसाल्यांपासून बनवलेले असतात. त्यामुळे हे पदार्थ ठेवल्यानंतर डबे पिवळे किंवा लाल दिसतात. कधी कधी पदार्थांमध्ये वापरण्यात आलेल्या तेलामुळे ते चिकट होतात. हे खराब झालेले किंवा पिवळसर डबे साफ करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आपण अशा 3 सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहणार आहोत, ज्याच्या मदतीने पिवळसर झालेले डबे सहज स्वच्छ करता येतील. या उपायांमुळे वेळही वाचेल आणि डब्यांची चमक पुन्हा परत येईल…

डबे कशामुळे पिवळसर आणि चिकट होतात?

किचनमधील डबे पिवळसर आणि चिकट होण्यामागे अनेक कारणे असतात. स्वयंपाक करताना उडणारे तेल आणि वाफ डब्यांवर बसते, त्यामुळे हळूहळू त्यावर तेलकट थर जमा होतो. मसाल्यांतील हळद, तिखट व इतर रंगद्रव्ये प्लास्टिकच्या डब्यांमध्ये राहिल्याने पिवळसरपणा वाढतो. डबे नीट धुतले नाहीत किंवा ओलेच ठेवले गेले तर त्यावर चिकट थर जमा होतो. तसेच गॅसजवळ ठेवलेल्या डब्यांचा धुरामुळे आणि उष्णतेमुळेही रंग बदलतो. वेळोवेळी स्वच्छता न केल्यास ही सगळी घाण एकत्र साचून डबे पिवळसर, चिकट दिसू लागतात.

किचनमधील डबे कसे करावेत?

किचनमधील डबे नियमितपणे आणि योग्य पद्धतीने स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. डबे साफ करण्यासाठी आधी ते गरम पाण्यात थोडा वेळ भिजवावेत, त्यामुळे त्यावरील तेलकटपणा आणि चिकटपणा कमी होतो. त्यानंतर डिशवॉश लिक्विड किंवा साबणाने स्पंजच्या मदतीने नीट घासून घ्यावे. पिवळसर झालेले किंवा जास्त मळलेले प्लास्टिक डबे साफ करण्यासाठी बेकिंग सोडा, लिंबू किंवा व्हिनेगरचा वापर करता येतो, ज्यामुळे डब्यांची जुनी चमक परत येते. स्टीलच्या डब्यांसाठी मीठ आणि लिंबाचा उपयोग प्रभावी ठरतो. डबे धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करूनच झाकण लावावे, यामुळे वास येत नाही आणि डबे स्वच्छ व सुरक्षित राहतात.

किचनमधील डबे खराब झाल्यामुळे शरीरावर कसा परिणाम होतो?

किचनमधील डबे खराब झालेले, पिवळसर किंवा चिकट असतील तर त्याचा आपल्या शरीरावर अप्रत्यक्ष पण गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा डब्यांमध्ये अन्न साठवले असता त्यावर जमा झालेली घाण, तेलकट थर आणि जंतुसंसर्ग अन्नात मिसळू शकतो. यामुळे पोटदुखी, अॅसिडिटी, उलटी-जुलाब किंवा फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो. जुन्या किंवा खराब झालेल्या प्लास्टिकच्या डब्यात गरम अन्न ठेवल्याने ते वितळून रसायन पदार्थामध्ये मिसळू शकते. हे रसायन शरीरासाठी हानिकारक असते. तसेच दीर्घकाळात हार्मोन्सच्या असंतुलनास कारणीभूत ठरू शकतात. ओलसर व नीट न स्वच्छ केलेल्या डब्यांमध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.