युजवेंद्र चहलच्या डेटिंग लाईफमध्ये नवा ट्विस्ट, RJ महवश सोबत ब्रेकअप होताच दिसला बिग बॉसच्या 'या' सुंदरीसोबत
abp majha web team January 25, 2026 03:43 PM

Yuzvendra chahal: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल त्याच्या व्यावसायिक आयुष्य पेक्षा त्याचा वैयक्तिक आयुष्य मुळे सध्या जास्त चर्चेत आहे. धनश्री वर्माशी घटस्फोट घेतल्यानंतर युजवेंद्र च नाव वारंवार कंटेंट क्रियेटर आर.जे.महवशसोबत जोडलं जात होतं. आता दोघांनी एकमेकांना instagram वर अनफॉलो केलं आहे. आता युजवेंद्र पुन्हा एकदा दुसऱ्याच एका सुंदर महिला सोबत दिसला त्यामुळे पुन्हा एकदा त्याच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत.

कोणासोबत दिसला युजवेंद्र चहल?

खरंतर काल रात्री युजवेंद्र चहल माझी न्यूज अँकर आणि बिग बॉसची माझी स्पर्धक शेफाली बग्गासोबत दिसला. त्यामुळे शेफाली आणि युजवेंद्रच्या डेटिंगच्या अफवांना पुन्हा उधान आले आहे. चहलला अलीकडेच एका रेस्टॉरंटच्या बाहेर शेफालीसोबत स्पॉट केले गेले.इंटरनेटवर त्यांचे फोटोही बघता बघता व्हायरल झाले. ही शॉर्ट भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मेटकरी क्रिकेटपटूच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू झाल्याचा अंदाज लावत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

यावेळी युजवेंद्र पापाराजींसाठी पोज देताना दिसला मात्र शेफाली बग्गा सहल पासून थोड्या अंतरावर उभी राहिलेली दिसली. कॅमेरा पासून स्वतःला लपवताना दिसली. मात्र पापाराजींनी शेफालीचेही फोटो काढले. युजवेंद्र चहल आणि शेफाली बघा या दोघांनीही या अफवांवर भाष्य केलेले नाही. आरजे मह्वेषने त्याला अन फॉलो केल्यामुळे त्याचे डेटिंगच्या बातम्या चर्चेत आल्या. सध्या या प्रकरणावर दोघांकडूनही कोणतेही प्रतिक्रिया आलेली नाही.मात्र सोशल मीडियावर चाहत्यांकडून चर्चा रंगल्या आहेत.

युजवेंद्र चहलचा कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिच्याशी 2025 मध्ये घटस्फोट झाल्यानंतरच आरजे महावशचं नाव चहलसोबत जोडलं जाऊ लागलं. मागील वर्षी आयपीएल सामन्यांदरम्यान दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. महवश अनेकदा स्टेडियममध्ये चहलला पाठिंबा देताना दिसली होती. यामुळे दोघं डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

मी सिंगल आहे आणि खुश.... - चहल

अलीकडेच चहल आणि महवश लंडन ट्रिपवर असल्याचंही समोर आलं. दोघांनी लंडनमधील एकाच लोकेशनवरील फोटो आपल्या-आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. मात्र, या नात्यावर आजवर कुणीही अधिकृत शिक्कामोर्तब केलं नव्हतं. महवशसोबतच्या नात्याबाबत विचारलं असता, चहलने एका मुलाखतीत हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता, “यार, मित्र-मैत्रिणी फिरतात, त्यात काही चुकीचं नाही. व्हिडिओ येतात म्हणून लगेच नातं आहे असं होत नाही. काहीच नाही, मी सिंगल आहे आणि खुश आहे.”

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.