Viral Video: अस्वलासमोर झुकला वाघ, जंगलातील थरकाप उडवणारी घटना
Tv9 Marathi January 25, 2026 03:45 PM

जंगल म्हटलं की उंच झाडे, भयाण शांतता, पक्षांचा आवाज, प्राण्यांचे फिरणे अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का जंगलातील खतरनाक प्राणी एकमेकांसमोर आल्यानंतर भयानक दृष्ट पाहायला मिळते. असेच काहीसे सवाई माधोपुर येथील रणथंभोर टायगर रिझर्वमध्ये घडले आहे. शुक्रवारी संध्याकाळी एक अनोखा वन्यजीवांचे दृश्य पाहायला मिळाले.

काय आहे व्हायरल व्हिडीओ?

झोन ३ आणि ४ च्या सीमेवर वाघिण रिद्धीचे (Riddhi) मादी बछडा (शावक) अस्वलाच्या (स्लॉथ बेअर) समोर आले आहे. जसे अस्वलाने त्या पिल्ल्लाला पाहिले तशी आक्रमक भूमिका घेतली. दोघांमध्ये शाब्दिक लढाई सुरू झाली आणि एकमेकांना आव्हान देणे सुरू झाले. अस्वलाच्या हुंकाराने वाघाच्या बछड्याला आपण हारत असल्याचे जाणावले. त्यानंतर त्याने जी भूमिका घेतली ती पाहून अनेकजण पाहातच राहिले. बछडा अस्वलासमोर हळूहळू गवतात बसून आत्मसमर्पण करु लागला. अशाप्रकारे एक खतरनाक लढाई टळली. या अद्भुत दृश्याने पर्यटक खूप रोमांचित झाले आणि त्यांनी हे क्षण कॅमेरात कैद केले.

सवाई माधोपुर के रणथंभौर टाईगर रिजर्व में टाइगर शावक और भालू की रोमांचक लड़ाई!, वीडियो सोशल मीडिया पर वायरल#Tiger | #bears | #viralvideo | Ranthambore National Park pic.twitter.com/UditaMZh5t

— Vistaar News (@VistaarNews)

रणथंभोरसारख्या राष्ट्रीय उद्यानात असा जवळचा सामना दुर्मीळ असतो. यातून हे दिसून येते की जंगलातील प्राणीही आपल्या मर्यादा आणि समजुतीने वागतात. ही घटना पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरली आणि आता सोशल मीडियावर ही खूप व्हायरल होत आहे.

रणथंभोर टायगर रिझर्व हे राजस्थानातील सर्वात लोकप्रिय आणि महत्वाचे टायगर रिझर्व आहे, जिथे २०२५-२०२६ च्या हिवाळ्यात टायगर साइटिंग खूप चांगली राहिली आहे. वाघिण रिद्धी (RBT-2302 किंवा Riddhi) ही रणथंभोरमधील प्रसिद्ध वाघिण आहे, जी झोन ३ मध्ये आपल्या बछड्यांसह (क्यूब्स) नियमित दिसते. तिच्या बिछड्यांपैकी एका मादी बछडा जानेवारी २०२६ मध्ये रणथंभोर किल्ल्याच्या पार्किंग भागात फिरताना दिसून आली होती, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

अस्वल (स्लॉथ बेअर) आणि वाघ यांच्यातील सामना रणथंभोरमध्ये पूर्वीही घडले आहेत, जसे की २०२५ मध्ये अस्वल आणि प्रौढ वाघ यांच्यातील रोमांचक मुकाबला व्हायरल झाला होता. जिथे अस्वलाचे धैर्य दाखवले होते. पण वाघाचा बछडा आणि प्रौढ अस्वल यांच्यातील हा प्रकार खूपच रोचक आहे, कारण बछडा अजून लहान आहे आणि अस्वलाची ताकद खूप जास्त असते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.