महातपूरमधे तीन दिवस संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराजांच्या द्वितीय समाधी दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम
esakal January 26, 2026 07:45 AM

महातपूरमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
..........
माढा, ता. २४ : संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागर महाराजांच्या द्वितीय समाधी दिनानिमित्त महातपूर (ता. माढा) येथे तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून
सकल दिगंबर जैन समाजाने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी साडेसात वाजता अभिषेक पूजन, सकाळी साडेनऊ वाजता आहारचर्या, दुपारी दीड वाजता आचार्य छत्तीसी विधान, दुपारी तीन वाजता मुनीश्नींचे प्रवचन, सायंकाळी साडेसहा वाजता मंगल आरती व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तर मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेसहा वाजता मुनीश्नींच्या सान्निध्यात जप व अनुष्ठान, सकाळी साडेसात वाजता अभिषेक पूजन, सकाळी साडेनऊ वाजता आहारचर्या, दुपारी एक वाजता शोभायात्रा, दुपारी दोन वाजता ध्वजारोहण आणि आचार्य श्री विद्यासागर महाराजांचे महापूजन, दुपारी अडीच वाजता मुनीश्नींचे विशेष प्रवचन, सायंकाळी सात वाजता मंगल आरती, रात्री आठ वाजता आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या जीवनावर विशेष कार्यक्रम होणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.