राहुरी: कणगर येथे शुक्रवारी (ता.२३) रात्री वन खात्याच्या हद्दीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले. पोलिसांनी रात्रीतून तपासाची चक्रे फिरविली. मृताच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे. दोन्ही आरोपींना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Pune News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक उड्डाण पूल होणार खुला; सेनापती बापट रस्त्यावीरल वाहतूक कोंडी सुटणार!सुधाकर किसन थोरात (वय ४०, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सात वाजता मृतदेह संशयितरित्या आढळल्यावर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तत्काळ पोलिसांची पथके तयार करून तपासाची चक्रे फिरविली. भेंडा (ता. नेवासे) येथे शनिवारी (ता.२३) पहाटे मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले. तिने दिलेल्या माहितीवरून दुसरा आरोपी ज्ञानेश्वर सागर याला साकूर मांडवे (ता. संगमनेर) येथे पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत पोलिसी खाक्या दाखविताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचे ज्ञानेश्वर याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यांच्या संबंधात पती सुधाकर अडसर ठरत होता. तिच्या सांगण्यावरून आरोपी ज्ञानेश्वर याने सुधाकर यांना गुरुवारी (ता. २२) साकूर मांडवे येथून दवाखान्यात जाण्याच्या बहाण्याने राहुरीला घेऊन गेला. कणगर शिवारात वन खात्याच्या हद्दीत निर्जनस्थळी सुधाकर यांचा उपरण्याने गळा आवळून खून करून ज्ञानेश्वर पसार झाला. दरम्यान, खुनाचा गुन्हा असल्याने भक्कम पुराव्यासाठी पोलिसांनी सुधाकर थोरात यांचा मृतदेह अहिल्यानगर येथे उत्तरीय तपासणीसाठी हलविला.
Pune News: प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! अनेक रेल्वेगाड्या शनिवार-रविवार रद्द; मोठी गैरसोय होणार, नेमकं काय कारण?कणगर येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. मृताच्या गळ्याला व्रण असल्याने खुनाच्या संशयावरून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे. अहिल्यानगर येथे उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविला होता. तेथे तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी नसल्याने मृतदेह पुणे येथे हलविला आहे. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यावर गुन्हा नोंदविणार आहे.
- संजय ठेंगे, पोलिस निरीक्षक, राहुरी