कर्तव्य पथावर परेडमध्ये यंदाच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या माध्यमातून आर्थिक आत्मनिर्भरता कशी आणली जाते, हे दाखवण्यात आले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रतील प्रमुख क्षण आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यात 60 ते 70 लाख कोटींची उलाढाल होते. आत्मनिर्भर भारत या मोहिमेला गणेशोत्सवाच्या माध्यमातून कशी चालना मिळते हे या चित्ररथाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
Republic Day : राष्ट्रपती मुर्मूंच्या हस्ते ध्वजारोहण होणार, कर्तव्य पथावर दीड तास परेडप्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर कर्तव्य पथावर दीड तास पथसंचलन होईल. विजय चौक ते लाल किल्ला अशी परेड असणार आहे.
BCCIचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचं निधनभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष इंद्रजित सिंह बिंद्रा यांचं निधन झालं. वयाच्या ८४ व्या वर्षी इंद्रजित बिंद्रा यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली.
Pandharpur : प्रजासत्ताक दिनी विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावटआज देशभरात 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशी विदेशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे विठुरायालाही तिरंग्याचे उपरण परिधान करण्यात आले आहे. पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांनी ही सजावट केली आहे . या सजावटीसाठी गुलाब, आस्टर झेंडू ,मोगरा ,जरबेरा ,ऑर्किड अशा विविध फुलांनी मंदिर सजवले आहे. यासाठी सुमारे दोन टन फुलांचा वापर करण्यात आला आहे.