'हॉट आहे का?' हॉस्टेलमधील रुममेटचे प्रायव्हेट फोटो, व्हिडीओ मैत्रिणीने प्रियकराला पाठवले
esakal January 26, 2026 01:45 PM

engineering college student allegedly filmed her hostel roommate while changing clothes : इंजिनीअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये सोबत राहणाऱ्या तरुणीने आपल्याच मैत्रिणीचे कपडे बदलतानाचे फोटो प्रियकराला पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी तरुणीसह तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित आणि आरोपी तरुणी छत्रपती संभाजीनगरमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आहेत. दोघीही गेल्या तीन वर्षांपासून वसतीगृहातील एकाच खोलीत राहत आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपी तरुणीने आपल्या रुममेटचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ आणि फोटो काढले. इतकच नाही तर हे व्हिडीओ तिने तिच्या प्रियकरालाही पाठवले.

Crime: गुप्तांगाला जखम, व्हिडिओ, अन्...; तरुणावर सामुहिक अत्याचार, म्हणाला- ते तिघे राक्षस होते, त्यांनी माझ्यावर...

दरम्यान, १९ जानेवारी रोजी रात्री आरोपी तरुणी तिच्या प्रियकराबरोबर फोनवर बोलत होती. यावेळी बोलताना “फोटो आणि व्हिडिओ कसे वाटले? हॉट आहेत का?” असे शब्द पीडितेच्या कानावर पडले. त्यामुळे तिला संशय आला. याबाबत तिने आरोपी तरुणीकडे विचारपूक केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तर दिली. त्यामुळे तिचा संशय अधिकच बळावला.

Crime: तरुणीनं प्रियकराला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला; प्रेयसीला राग अनावर, क्रीडांगणात गाठलं अन्..., काय घडलं?

अशातच पीडित तरुणीने तिचा मोबाईल हिसकला. तसेच पासवर्ड विचारून मोबाइल तपासला असता कपडे बदलतानाचे आपलेच व्हिडिओ आरोपी तरुणीने चोरून काढून ते तिच्या प्रियकराला पाठवल्याचे उघड झाले. त्यानंतर तिला धक्काच बसला. तिने तत्काळ पोलीस ठाणे गाठत दोघांविरोधात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतल आहे पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.