150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात कोण ठरले नंबर वन? देवेंद्र फडणवीसांकडून प्रजासत्ताक दिनी यादी जाहीर, कोणत्या कार्यालयांनी मारली बाजी?
अभिषेक मुठाळ January 26, 2026 02:43 PM

150 days E-Governance Reform Program: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात (E-Governance Reform Program) उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची यादी आज प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे करण्यात आलेल्या मूल्यमापनानंतर राज्यातील विविध संवर्गातील सर्वोत्कृष्ट शासकीय कार्यालयांची निवड करण्यात आली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ‘एक्स’ वर पोस्ट माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांना त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026) शुभेच्छा दिल्या असून, ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील विजेत्या कार्यालयांचे अभिनंदन केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत करण्यात आले.”

150 days E-Governance Reform Program: 7 महत्त्वाच्या निकषांवर मूल्यमापन

या कार्यक्रमांतर्गत शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन खालील सात सर्वंकष मुद्यांवर करण्यात आले. 

  • कार्यालयाची अधिकृत वेबसाईट
  • ‘आपले सरकार’ प्रणालीचा वापर
  • ई-ऑफीस प्रणाली
  • कार्यालयीन डॅशबोर्ड
  • व्हॉट्सऍप चॅटबॉटचा वापर
  • शासकीय कामकाजात AI व Blockchain तंत्रज्ञानाचा वापर
  • GIS तंत्रज्ञानाचा कार्यक्षम वापर

या सर्व निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली आहे.

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालये

विविध संवर्गांतील विजेती कार्यालये पुढीलप्रमाणे 

  • जिल्हाधिकारी कार्यालय: जळगाव
  • पोलिस अधीक्षक कार्यालय: ठाणे ग्रामीण
  • महानगरपालिका: पनवेल
  • पोलिस आयुक्त कार्यालय: नाशिक
  • विभागीय आयुक्त कार्यालय: नागपूर
  • पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय: नांदेड
  • राज्यस्तरीय आयुक्तालय / संचालनालय: संचालक, तंत्र शिक्षण
  • राज्यस्तरीय मंडळे / महामंडळे / प्राधिकरण: महाराष्ट्र सागरी मंडळ
  • मंत्रालयीन विभाग: सार्वजनिक बांधकाम विभाग

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, उपरोक्त विविध संवर्गांतील उत्कृष्ट कार्यालयांची सविस्तर यादी जाहीर करण्यात आली असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदांची नावे येत्या 8 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहेत.

150 days E-Governance Reform Program: विजेत्यांचा लवकरच होणार गौरव

“150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या सर्व कार्यालयांचे प्रमुख आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे हार्दिक अभिनंदन. राज्य शासनातर्फे सर्व विजेत्यांचा लवकरच सन्मान करण्यात येईल,” असेही फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

आणखी वाचा 

Eknath Shinde BMC Election 2026: एकनाथ शिंदेंनी 'तो' धोका ओळखला, मुंबईत शिंदे सेनेची स्वतंत्र गटनोंदणी करणार, भाजपसोबत संयुक्त गट न करण्यामागील नेमकं कारण काय?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.