भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात कापूर (Camphor) केवळ एक पूजेचे साहित्य नसून ते सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. 'कर्पूरगौरं करुणावतारं...' या मंत्रावरूनच आपल्याला कापूरला देवकार्यात किती महत्त्व आहे हे समजते.
अनेक घरांमध्ये सकाळी पूजा करताना कापूर जाळला जातो. परंतु शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळण्याचे विशेष महत्त्व आणि फायदे सांगण्यात आले आहेत.
संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. ज्या घरात संध्याकाळी कापूर जाळला जातो आणि त्याचा सुगंध दरवळतो, तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते.
शुद्ध आणि पवित्र वातावरणात देवी लक्ष्मीचा वास असतो, ज्यामुळे घरातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. अनेकदा घराची रचना वास्तुशास्त्रानुसार नसल्यास घरात कलह किंवा प्रगतीत अडथळे येतात.
दररोज संध्याकाळी एका पितळी किंवा मातीच्या पात्रात कापूर जाळून तो संपूर्ण घरात फिरवल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात. कापूरच्या धुरामुळे वातावरणातील जंतू नष्ट होतात. तसेच नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक लहरी निर्माण होतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव वाढला आहे. संध्याकाळी कामावरून घरी परतल्यानंतर जर घरातील वातावरण प्रसन्न नसेल, तर चिडचिड वाढते. कापूरचा सुवास मेंदूला शांत करण्याचे काम करतो. यामुळे घरातील सदस्यांचे मन प्रसन्न राहते. तसेच नैराश्याची भावना कमी होण्यास मदत होते.
जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाच्या विळख्यात अडकला असाल, तर शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे देवतांचे आशीर्वाद मिळतात. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात, असे मानले जाते.
केवळ धार्मिकच नव्हे, तर विज्ञानाच्या दृष्टीनेही कापूर महत्त्वाचा आहे. कापूर जाळल्याने हवेतील बॅक्टेरिया आणि हानिकारक विषाणू नष्ट होतात. विशेषतः पावसाळ्यात किंवा संध्याकाळी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कापूर जाळणे हा एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय आहे.