Hypersonic Missile : भविष्यातलं ब्रह्मास्त्र, शत्रू थरथर कापणार, भारताने जगाला दाखवलं आपलं पहिलं हायपरसोनिक मिसाइल, काय खास आहे यात?
admin January 26, 2026 04:24 PM
[ad_1]

आज 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारताने जगाला आपली हायपरसोनिक मिसाइल दाखवली. डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायजेशनने (DRDO) लॉन्ग रेंज अँटी-शिप हायपरसोनिक ग्लाइड मिसाइल (LRAShM) बनवली आहे. ही मिसाइल भारतीय नौदलासाठी बनवण्यात येत आहे.

हिंदी महासागर क्षेत्रात भारताची समुद्री हल्ल्याची क्षमता या मिसाइलमुळे अजून बळकट होणार आहे. ही मिसाइल हायपरसोनिक आहे. त्यामुळे शत्रुच्या रडारला ही मिसाइल सापडणार नाही.

या मिसाइलची खासियत काय?

रेंज : जवळपास 1500 किलोमीटर

स्पीड : हायपरसोनिक (मॅक 8-10 पर्यंत) शत्रुच्या जहाजाला 15 मिनिटापेक्षा कमीवेळात नष्ट करु शकते.

प्रकार : हायपरसोनिक ग्लाइड व्हीकल (HGV) रॉकेट पेक्षा वर जाते. ग्लाइड करत अनियमित रस्त्याने आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचते. या अशा मिसाइलला रोखणं खूप कठीण असतं.

पेलोड : विभिन्न प्रकारचे वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम. शत्रुच्या युद्धनौका, विमानवाहू युद्धनौकांना नष्ट करण्यास सक्षम.

उद्देश्य : खासकरुन शत्रुंच्या युद्धनौकांसाठी निर्मिती. भविष्यात लँड म्हणजे जमिनीवरुन हल्ला करण्यास सक्षम मिसाइल बनवणार.

विकास : DRDO च्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिसाइल कॉम्प्लेक्स हैदराबाद येथे या मिसाइलवर काम सुरु आहे. हायपरसोनिक ग्लाइड आणि क्रूझ मिसाइल टेक्नोलॉजीवर काम सुरु आहे.

ही मिसाइल महत्वाची का?

ही मिसाइल शत्रुच्या रडारला चकवा देऊन वेगाने हल्ला करु शकते. हायपरसोनिक स्पीडमुळे शत्रुला उत्तर द्यायला फार कमी वेळ मिळतो. हिंदी महासागर क्षेत्रात भारताची स्थिती अजून मजबूत होईल. खासकरुन चिनी नौदलाविरुद्ध. भविष्यात या मिसाइलची रेंज 3000 ते 3500 हजार किलोमीटरपर्यंत वाढवण्याचं DRDO चं लक्ष्य आहे.

हायपरसोनिक मिसाइल भारताचं भविष्य आहे, असं DRDO चे वैज्ञानिक मानतात. या मिसाइलमुळे भारताचा रशिया, चीन आणि अमेरिका या निवडक देशांच्या पंक्तीत समावेश होईल.

 


[ad_2]
Source link
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.