सांगली: पक्षाचे नुकसान होता कामा नये, असा संकल्प प्रत्येकाने करावा. पक्षाने सगळे देऊनही गद्दारी चालणार नाही, असा इशाराच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिला. महापालिका कमिशन मिळवण्याची पेढी नव्हे, असे सांगत कामांसोबत माणसे जोडण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
Pune News: ‘एमपीएससी’कडून उमेदवारांना मोठा दिलासा! संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पदसंख्येत वाढ, ६०१ पदांसाठी भरती प्रक्रिया..खरे मंगल कार्यालयात विजयी मेळावा, नूतन नगरसेवकांचा सत्कार तसेच लढलेल्या पण पराभूत झालेल्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी त्यांचाही सन्मान पाटील यांच्या हस्ते झाला. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, नीता केळकर, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, "पार्टी खूप प्रेम करते म्हणून कसेही वागून चालणार नाही. पद दिले म्हणून काहीही चालणार नाही. सगळे देऊनही तो गद्दारी करतो, हे खपवून घेणार नाही. धमकी देत नाही, प्रेमाने सांगतोय, असे त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासाचे व्हिजन असले पाहिजे. अभ्यास केला पाहिजे. विमानतळ झाले पाहिजे. कार्गो कसे होईल, यासाठी प्रयत्न
हवा. शहर प्रामुख्याने पब्लिक युटीलिटी इलेक्ट्रिसिटी पॉईंट होते. कचरा प्रकल्प आहे. त्यांचे वीज बिल बारा-तेरा कोटी येते. त्यांच्याशी बोललो आणि आपल्याला एक रुपया खर्च करायला न लागता केंद्राच्यावतीने तो प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, नूतन नगरसेवकांनी आपल्या प्रभागात अद्ययावत जनसंपर्क कार्यालय सुरू करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महापालिकेला निधी मिळेल. पक्षाचे कार्यक्रम आपण राबवले पाहिजेत.
आमदार सुरेश खाडे म्हणाले, नगरसेवकाला पाच वर्षे पाहिलेच नाही अशा तक्रारी प्रचार करताना आल्या. त्या यापुढे येऊ नयेत. महिन्यातून एक जनता दरबार घेतला पाहिजे. तेथे आम्ही अधिकाऱ्यांना घेऊन येऊ आणि नागरिकांचे प्रश्न सोडवू, जे नगरसेवक निवडून आले, त्यांच्या इतकाच मान पराभूत नगरसेवकाला मिळेल, जाहीरनाम्यात जे जे शब्द दिले ते पूर्ण करण्यास आपण कटिबद्ध आहोत.
मकरंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महापालिकेसाठी जाहीरनामा प्रकाशित केला. तिन्ही शहरांचा चेहरामोहरा बदलण्याचं आश्वासन दिले आहे. भाजपचा कार्यकर्ता लोकांसाठी धावून गेला पाहिजे. प्रभाग कुटुंब आहे हे लक्षात घेऊन काम करावे."
Pune News: प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! अनेक रेल्वेगाड्या शनिवार-रविवार रद्द; मोठी गैरसोय होणार, नेमकं काय कारण? माणसे जोडणारे उपक्रम राबवारस्ते, गटारी आदी समस्या सोडवायच्या आहेत. पण तेच काम नाही. मनपाने स्वतःचे काही प्रकल्प राबवावेत. माणसांना जोडणारे उपक्रम राबवा. त्यासाठी सीएसआर निधी मिळेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.